Sunita Ahuja Reacts To Divorce Rumours : लोकप्रिय अभिनेता गविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशातच सुनीता आहुजा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार आहेत. त्यावेळी त्यांनी गोविंदाबद्दल सांगितलं आहे.
सुनीता आहुजा अनेकदा ठामपणे त्यांची मतं व्यक्त करत असतात. त्या अनेकदा गोविंदाबद्दलही परखडपणे बोलतात. सुनीता आता लवकरच ‘कलर्स टीव्ही’वरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात झळकणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सुनीता यांनी गोविंदा व त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमाच्या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अभिषेक कुमार सुनीता यांना “गोविंदा आणि तुमच्याबद्दल चर्चा सुरू असतात. बरेच लोक आपआपसात अफवा पसरवत असतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?” असा प्रश्न विचारतो.
गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या अफांवर सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया
सुनीता त्यावेळी म्हणताना दिसतात की, “४० वर्ष एकत्र राहणं सोपी गोष्ट आहे का? प्रत्येक पुरुष चुका करतो, प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. तारुण्यात चुका केल्या, पण वयाच्या ६२ व्या वर्षी जेव्हा इतकी मोठी मुलं आहेत, तेव्हा कसं कोणी अशी चूक करेल.”
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार सुनीता काही दिवसांपूर्वीच ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर पाहायला मिळालेल्या. त्यावेळी पापाराझींशी संवाद साधताना त्या गंमत करत म्हणालेल्या, “एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, मी काय पंगा केला आहे ते; पंगा क्वीन आहे मी माहितीये ना?”
गणेशोत्सवानिमित्त काही दिवसांपूर्वीच गोविंदा व सुनीता एकत्र पाहायला मिळाले होते. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी घटस्फोटाच्या अफवा खोट्या ठरवल्या होत्या. त्यावेळी ते म्हणालेले, “आज इतकं जवळ पाहून… जर काही असतं तर आम्ही एकत्र असतो का? आमच्यामध्ये दुरावा आहे? कोणी आम्हा दोघांना वेगळं करू शकत नाही. देव आले किंवा भूत आले तरी आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही.”
गोविंदा व सुनीता आहुजा यांनी १९८७ साली लग्न केलेलं. आता या दोघांच्या लग्नाला सुनीता यांनी सांगितल्याप्रमाणे ४० वर्ष झाली आहेत. या दोघांना टीना आहुजा व यशवर्धन आहुजा नावाची दोन मुलंही आहेत. त्यांचा मुलगा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.