Premium

“मी कोमात होतो, माझी दृष्टी गेलेली…” मनोज जोशींनी सांगितल्या ‘देवदास’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना स्ट्रोक आला ज्यामुळे त्यांच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम झाला

manoj-joshi
फोटो : जनसत्ता

भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवलेले ‘चाणक्य’ अभिनेते मनोज जोशी यांनी हिंदी, मराठी तसेच गुजराती मनोरंजनविश्वात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. याबरोबरच टेलिव्हिजन, नाटक अन् चित्रपट या तीनही माध्यमात काम करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. मनोज यांनी नुकतंच आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच मनोज यांनी ‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना स्ट्रोक आला ज्यामुळे त्यांच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम झाला व काही दिवस त्यांना संपूर्णपणे बेड रेस्ट घ्यावी लागली. त्यानंतर एका टीव्ही शोमधून दमदार कमबॅक केला.

आणखी वाचा : प्रोपगंडा चित्रपटच का? ‘द व्हॅक्सिन वॉर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खोडून काढले आरोप

याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “२००१ मध्ये मी आजारी होतो. देवदासचं चित्रीकरण करताना मला स्ट्रोक आला अन् मी तब्बल दीड वर्षं हॉस्पिटलमध्येच होतो. पहिले चार दिवस तर मी कोमात होतो, माझी दृष्टी पूर्णपणे गेली होती, १९ दिवस मला काहीच दिसत नव्हतं. त्यावेळी माझा बँक बॅलेन्सही काहीच नव्हता, माझ्या पत्नीने शिकवण्या घेऊन मला यातून बाहेर यायला मदत केली. हा माझा पुनर्जन्मच आहे.”

पुढे मनोज म्हणाले, “२००३ मध्ये ‘केहता है दिल’ या मालिकेतून मुख्य खलनायकाच्या भूमिकेतून मी कमबॅक केलं. सर्वप्रथम या मालिकेत माझे काम पहिले चार दिवसच होतं, पण नंतर लोकांना ते इतकं आवडलं की मी त्यांच्या कथेतील एक महत्त्वाचं पात्रच बनलो. त्यानंतर मला चित्रपट हळूहळू मिळू लागले अन् ‘हंगामा’, ‘हलचल’सारखे १२ चित्रपट मी सलग प्रियदर्शन यांच्याबरोबर केले.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor manoj joshi reveals he suffered a stroke during shoot of devdas avn

First published on: 21-09-2023 at 11:05 IST
Next Story
कपूर खानदानाचा बिनधास्त आविष्कार ‘बेबो’