scorecardresearch

Premium

प्रोपगंडा चित्रपटच का? ‘द व्हॅक्सिन वॉर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खोडून काढले आरोप

विवेक अग्निहोत्री हे कायम प्रोपगंडा चित्रपट बनवतात असा आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर केला गेला आहे

vivek-agnihotri2
फोटो : आयएमडीबी

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापासूनच विवेक अग्निहोत्री हे कायम चर्चेत आहेत. चित्रपटाबरोबरच ते बॉलिवूडबद्दल अन् स्टार सिस्टमबद्दल परखडपणे भाष्य करतात.

चित्रपटसृष्टीतील राजकारण, घराणेशाही याबद्दलही विवेक यांनी बऱ्याचदा भाष्य केलं आहे. याबरोबरच ते राजकीय भूमिका घ्यायलाही पुढे मागे बघत नाहीत. यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टीकाही झालेली आहे. गेल्या वर्षाचं चित्र पाहता विवेक अग्निहोत्री हे कायम प्रोपगंडा चित्रपट बनवतात असा आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर केला गेला आहे.

amit-rai-omg2
‘OMG 2’चे दिग्दर्शक यांनी ‘CBFC’ला म्हटलं ढोंगी; म्हणाले, “रॉकी और रानीमधील किसिंग…”
thalaivar170
१७० वा चित्रपट ठरणार रजनीकांत यांच्यासाठी खास; ३२ वर्षांनी थलाईवा व महानायक एकत्र, निर्मात्यांची मोठी घोषणा
hema malini and esha deol
धर्मेंद्र यांच्यानंतर आता हेमा मालिनीही चित्रपटांमध्ये करणार कमबॅक? ईशा देओलने केला खुलासा, म्हणाली…
Allu
अल्लू अर्जुनने पहिला शाहरुख खानचा ‘जवान’, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला, “चित्रपटाचे निर्माते…”

आणखी वाचा : कास्टिंग काउचचे अनुभव अन् यश चोप्रा यांना भेटायला दिलेला नकार; अदिती गोवित्रीकरने दिलं स्पष्टीकरण

‘नवभारत टाईम्स’शी संवाद साधताना विवेक यांनी त्यांच्यावर लागलेले आरोप खोडून काढले आहेत. ते म्हणाले, “दरवर्षी बनणाऱ्या महत्त्वपूर्ण चित्रपटांच्या यादीत आमचं नाव कधीच नसतं. आजकाल एखादं पोस्टर जरी प्रदर्शित झालं तरी त्यावर भरपूर चर्चा होते. आमच्या चित्रपटाचा ट्रेलर आलाय तरी कुणीच फारशी दखलही घेतलेली नाही. ही लोक तर मला फिल्ममेकर म्हणूनही मान्यता देत नाहीत, इंडस्ट्री माझ्या चित्रपटांना प्रोपगंडा म्हणते, पण माझा चित्रपट हा जनतेसाठी आहे ज्यांना विचार करायचा आहे.”

यामागील कारण सांगताना अग्निहोत्री म्हणाले, “यासाठी फिल्म इंडस्ट्रीमधील अन् राजकारणातील काही लोक कारणीभूत आहेत. मी जर एखादा पोलिटिकल चित्रपट बनवला तर ज्यांना तो पटणार नाही ते त्याचा विरोध करणारच आहे. यासिर मल्लीकसारख्या माणसाला दिल्लीत बोलावून पुरस्कार देणाऱ्या लोकांना आमचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रोपगंडा वाटणारच त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The vaccine war director vivek agnihotri answers to them who calls his film propaganda avn

First published on: 20-09-2023 at 18:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×