कंगना रणौत ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. आता सर्वत्र कंगना लवकरच लग्न करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लग्नाची पत्रिका देतानाचा व्हायरल होत असलेला तिचा एक व्हिडीओ.

कंगनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाच्या घराला लायटिंग केलेले दिसत आहे. अशातच कंगना गाडीतून नटूनथटून येते. तिला बघताच रिपोर्टर्स तिच्याकडे जातात आणि तिला विचारतात की, “तुम्ही खरोखर लग्नबंधनात अडकणार आहात का?” त्यावर कंगना त्यांना म्हणते की, “बातम्या तर तुम्ही देता. मी फक्त आनंदवार्ता देते.” यानंतर ती तिच्या लग्नाची पत्रिका मीडिया रिपोर्टर्सना देते आणि म्हणते, “तुम्ही सगळे नक्की या.”

आणखी वाचा : “ड्रग्ज घेणाऱ्या अभिनेत्याने श्रीरामांची भूमिका…,” कंगना रणौतची प्रसिद्ध अभिनेत्यावर जोरदार टीका

तिच्या व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत कंगना लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा करायला सुरुवात केली. परंतु ही लग्नपत्रिका तिच्या खऱ्या लग्नाची नसून आगामी चित्रपटातील तिच्या लग्नाची आहे. तिच्या आगामी ‘टीकू वेड्स शिरू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

हेही वाचा : आलिशान घर, गाड्या अन्… बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

हा व्हिडीओ समोर येताच तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आणि त्यांनी तिच्या या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. तर दुसरीकडे काहींची कंगना लग्नबंधनात अडकत नसल्याने निराशा झाली आहे. या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. हा चित्रपट २३ जून रोजी ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होत आहे.