अभिनेत्री क्रिती खरबंदा काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. १६ मार्चला क्रितीने अभिनेता पुलकित सम्राटबरोबर लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात, रितीरिवाजानुसार क्रिती व पुलकितचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सध्या क्रितीने लग्नानंतर पहिल्यांदाच बनवलेल्या खास पदार्थचा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
अभिनेत्री क्रिती खरबंदाने तिच्या इन्स्टाग्रामवर या खास पदार्थचे फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्रीनं सासरच्यांसाठी हलवा बनवला होता. क्रितीच्या हातचा हलवा तिच्या आजी देखील आवडला. हे फोटो शेअर करत क्रितीने लिहिलं आहे की, मी बनवलेला पहिला पदार्थ.
या फोटोमध्ये क्रिती गुलाबी सलवार सूटमध्ये दिसत आहे. हातात लाल रंगाच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अशा लूकमध्ये अभिनेत्री पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला आवडलं प्रसाद ओकचं आलिशान घर, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या सेटवर क्रिती-पुलकित एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर दोघं डेट करू लागले. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीनं रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, पुलकित शेवटचा ‘फुकरे ३’ चित्रपटात झळकला होता. तर क्रिती लवकरच ‘रिस्की रोमिया’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सनी सिंहबरोबर झळकणार आहे.