छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. या कलाकारांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतं आहेत. त्यामुळे आता या कलाकारांचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

नुकतंच या कार्यक्रमाचा परीक्षक प्रसाद ओकने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमला नव्या घरी पार्टी दिली. या पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. हास्यजत्रेच्या सर्व कलाकार मंडळींनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रसाद ओकच्या नव्या घरातल्या पार्टीची फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा- २४ वर्षांनंतर तब्बूचा ब्लॉकबस्टर ‘चांदनी बार’ चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद व त्याची बायको मंजिरी ओकसहचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोवर अभिनेत्रीने लिहिलं आहे, “सुंदर घर. अशा रितीने ओकांची पार्टी सुफळ संपूर्ण.” नम्रताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद ओकच्या पार्टीला सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अमित फाळके, प्राजक्ता माळी, पृथ्वीक प्रताप, नम्रता संभेराव, चेतना भट, ओंकार राऊत, दत्तू मोरे, प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले, अरुण कदम, वनिता खरात, रोहित माने, निखिल बने, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर अशा हास्यजत्रेतील सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रसाद आणि त्याच्या कुटुंबियांनी २०२४ची सुरुवात या नव्या घरातून केली होती. १ जानेवारी २०२४ला प्रसादने नव्या घराची पहिली झलक दाखवली होती.