Masaba Gupta Blessed With Baby Girl: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत. त्यांची लेक फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता हिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. मसाबा व सत्यदीप मिश्रा आता एका गोंडस लेकीचे आई-बाबा झाले आहेत. मसाबाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मसाबा व सत्यदीप या दोघांनी जानेवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. मसाबा व सत्यदीप यांच्या घरी ११ ऑक्टोबरला लेकीचं आगमन झालं. मसाबाने इन्स्टाग्रामवर लेकीचा पहिला फोटोदेखील शेअर केला आहे.

हेही वाचा – लग्नानंतर तीन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस लेकीला दिला जन्म, पोस्ट केली शेअर

पहिल्या फोटोत तिने ११ ऑक्टोबरला मुलगी झाली याबाबत माहिती दिली आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या चिमुकल्या लेकीचा पाय दिसत आहे. मसाबा व सत्यदीपच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…

दिया मिर्झा, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, आयुष्मान खुराना, सोनम कपूर आणि सोनी राजदान यांनी या पोस्टवर कमेंट करून सत्यदीप व मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मसाबा गुप्ता व तिचा पती अभिनेता सत्यदीप मिश्रा (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – Video: तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

मसाबा व सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी त्यांनी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. मसाबाचे वडील क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सदेखील या लग्नाला आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress neena gupta daughter masaba gupta blessed with baby girl satyadeep misra hrc