actress urvashi rautela shared video for rishabh pant for his birthday | Loksatta

Video : ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने शेअर केला व्हिडीओ, ‘फ्लाइंग किस’ देत म्हणाली…

उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Video : ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने शेअर केला व्हिडीओ, ‘फ्लाइंग किस’ देत म्हणाली…
उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो : उर्वशी रौतेला/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. आताही तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फ्लाइंग किस देताना दिसत आहे. या पोस्टला तिने ‘हॅपी बर्थडे’ असं कॅप्शनही दिलं आहे. उर्वशीच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांना पुन्हा एकदा ऋषभ पंतची आठवण आली आहे. भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त उर्वशीने पोस्ट शेअर केली असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

उर्वशीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. “आता काही नाही होऊ शकत दीदी”, अशी कमेंट एका अकाऊंटवरून करण्यात आली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत “ऋषभ पंतचा वाढदिवस” अशी कमेंट केली आहे. “कोणाचा वाढदिवस आहे? ऋषभ पंतचा का?”, अशी कमेंट एकाने केली आहे.

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

हेही वाचा >> ‘मिर्झापूर’मधील ‘कालिन भैय्या’ दिसणार नव्या भूमिकेत; पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाने ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून केले घोषित

उर्वशी रौतेलेच्या या व्हिडीओमुळे तिच्या आणि ऋषभ पंतबद्दलच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उर्वशीने तिचा जुना फोटो “मौत से पहले भी एक और मौत होती है, देखो जरा अपनी मोहब्बत से दूर होकर”, असं कॅप्शन देत शेअर केला होता. या पोस्टवरूनही नेटकऱ्यांनी उर्वशीची फिरकी घेतली होती. ऋषभ पंत आणि उर्वशीमधील वादाचीही बरीत चर्चा रंगली होती.

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

ऋषभ पंत आणि उर्वशीमध्ये बिनसल्यानंतर तिचं नाव पाकिस्तानचा क्रिकेटपटू नसीम शाहसह जोडलं गेलं होतं. उर्वशी आणि नसीम एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु नंतर त्यांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझी भूमिका तुम्हाला… ” आदिपुरुष चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रिती सेनॉनची स्पष्ट प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल
“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा
‘दृश्यम’मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव
Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट
अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य
Rohit Sharma Injured: जखमी असूनही खेळायला उतरला रोहित, पत्नी रितिका आणि सूर्यकुमारच्या ट्विटने जिंकले मन
Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री
पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण
Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल