बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने उत्तम अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘मिर्झापूर’, ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ‘गुंजन सक्सेना’, ‘स्री’, ‘गॅंग ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

‘मिर्झापूर’मध्ये कालिन भैय्याची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात घर करणाऱा पंकज त्रिपाठीवर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाकडून ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता तो मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जनतेला आवाहन आणि त्याबाबत जनजागृती करणार आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा >> Bigg Boss Marathi 4: “तुझ्यासारख्या उद्धट व्यक्तीबरोबर खेळण्यापेक्षा…”, अपूर्वा-प्रसादमधील वाद गेला विकोपाला

देशातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे याबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॉन निवडला जातो. २०१४मध्ये भारताचा स्टार क्रिकेटर चेतेश्वर पुजाराला आणि त्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीलाही नॅशनल आयकॉन घोषित करण्यात आले होते.  

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज त्रिपाठीने कार्यक्रमात त्याने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावल्याचा किस्साही सांगितला. मतदानाच्या अधिकारामुळे सन्मानही मिळाला असल्याचं त्याने सांगितलं. तरुणांना त्याने मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आवाहनही केलं. पंकज त्रिपाठीने दोन दशकांहून अधिक काळापासून कलाविश्वात योगदान दिले आहे. लवकरच तो ‘ओह माय गॉड-२’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री यामी गौतमही दिसणार आहे.