‘आदिपुरुष’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटाबद्दल नवनवीन अपडेट समोर येत असतानाच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रत्येक शो दरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय दिग्दर्शक ओम राऊतने जाहीर केला. आता या राखीव सीटच्या बाजूच्या सीट या तिकिटाची किंमत किती असेल हे समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदिपुरुष’च्या ॲडव्हान्स बुकिंगला कालपासून सुरुवात झाली. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २४ तासांच्या आतच या चित्रपटाची ५० हजारांहून अधिक तिकिटं विकली गेली. तर आतापर्यंत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच दोन कोटींच्या आसपास कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होणार अशी चिन्हं दिसत आहेत.

आणखी वाचा : “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर प्रभासने सोडलं मौन, विवाहस्थळाचा खुलासा करत म्हणाला…

या चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत थोडी जास्त असेल असं बोललं जात होतं. परंतु ‘टी-सीरिज’ कंपनीने एक ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. ” ‘आदिपुरुष’च्या तिकिटांच्या किमतीबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. शो दरम्यान हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत जास्त असेल असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र तसं काहीही नाही. हनुमानासाठी राखीव सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमतही इतर तिकिटांच्या किमतीइतकीच असेल,” असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

त्यामुळे हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटवर बसून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना कोणतीही जास्त रक्कम द्यावी लागणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush producers clarify that there is no extra price for the seat besides the seat of lord hanuman rnv