Ahaan Shetty Jiya Shankar Dating Rumors : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी मराठी अभिनेत्री जिया शंकरला डेट करतोय, अशा चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून होत आहेत. जिया शंकर सुनील शेट्टीची सून होणार, अहान व जिया यांनी नातं लपवून ठेवलंय, या सर्व चर्चांवर आता अहानच्या टीमने मौन सोडलं आहे.

अहान व जिया फक्त डेटिंग करत नाहियेत, तर लग्नाचा विचारही करत आहेत, असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. या सर्व चर्चांवर अहान शेट्टीच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

“अहान व जियाच्या डेटिंगच्या अफवांमध्ये काहीच सत्य नाही. अहान सध्या कोणालाही डेट करत नाहीये, तो पूर्णपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. त्याचा बॉर्डर २ लवकरच येत आहे,” असं अहान शेट्टीच्या प्रवक्त्याने सांगितलं.

अहानच्या टीमने या अफवा फेटाळून लावल्या असल्या तरी, जियाच्या टीमकडून याबद्दल काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. इतकंच नाही तर अहान व जिया या दोघांनीही यासंदर्भात अधिकृत निवेदन दिलेले नाही.

अहान शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अहान शेट्टीने २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या साजिद नाडियाडवालाच्या ‘तडप’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात अभिनेत्री तारा सुतारियाने मुख्य भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पहिल्या चित्रपटानंतर अहान शेट्टी पडद्यावरून गायब झाला. साजिद नाडियाडवालाने अहानला आणखी एक संधी दिली. त्याला ‘सनकी’ चित्रपटात घेतलं, यात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. पण सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता अहान बॉर्डर २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दुसरीकडे, जिया शंकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. बिग बॉस ओटीटी फेम जिया शंकरने ‘वेड’ या मराठी चित्रपटात रितेश देशमुख व जिनिलीयाबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. ती बिग बॉस ओटीटी, मेरी हानिकारक बीवी, पिशाचिनी, काटेलाल अँड सन्स या मालिकांसाठी ओळखली जाते.