Aishwarya Rai and Aaradhya’s Video: अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या ‘पॅरिस फॅशन वीक‘मधील तिचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या ‘पॅरिस फॅशन वीक‘मधील तिचे रॅम्प वॉकचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील तिचा अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने रॅम्पवॉकवर नमस्कार करीत चाहत्यांची मने जिंकली. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्यांचे कौतुक केले होते.
आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती चाहत्यांबरोबर बोलत असल्याचे, त्यांना आटोग्राफ देत असल्याचे दिसत आहे. या सगळ्यात ऐश्वर्या नाही, तर तिची लेक आराध्याने लक्ष वेधले आहे. ती चाहत्यांकडे उत्सुकतेने बघत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिच्या निरागसतेने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आई आणि मुलीच्या जोडीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “आराध्या व ऐश्वर्या खूप क्यूट दिसतात.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आराध्या खूप क्यूट आहे. किती लक्ष देऊन बघत आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले,”ती क्यूट आहे.” एकाने लिहिले, “ती किती निरागस आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मी तर आराध्यालाच बघत आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जगातील सगळ्यात भाग्यवान मुलगी” अशा अनेकविध कमेंट्स केल्या गेल्या आहेत.
“या दोघी चांगल्या मैत्रिणींसारख्या कायम एकत्र असतात”, “आराध्या सगळ्यात भाग्यवान मुलगी आहे. कारण- तिची आई ऐश्वर्या आहे”, “ती खूप निरागसपणे गोष्टी बघत आहे”, “ती ऐश्वर्यासारखीच सुंदर आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
याआधी एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आराध्या कॅमेरा टाळत असल्याचे दिसले होते. दरम्यान, आराध्या नेहमीच ऐश्वर्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसते. मायलेकीची ही जोडी कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०११ ला आराध्याचा जन्म झाला. लग्नानंतर काही वर्षे ऐश्वर्या अभिनयापासून दूर होती. आता मात्र पुन्हा ती काम करत असल्याचे दिसत आहे. तर अभिषेक बच्चनदेखील विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. नुकताच तो ‘कालीधर लापता’मध्ये दिसला होता.