Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Dance: गेल्या वर्षभरापासून ऐश्वर्या राय-बच्चन आणि आभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबायचं काही नावचं घेत नाही. शिवाय यावर ऐश्वर्या आणि अभिषेकने मौन धारण केलं आहे. दोघं आपल्या कृतीमधून एकत्र असल्याचं सतत दाखवून देत आहेत. अलीकडेच दोघं ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नात एकत्र दिसले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच लग्न समारंभातील आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या व अभिषेक एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हे पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी, ३० मार्चला पुण्यात ऐश्वर्या राय-बच्चनची चुलत बहीण श्लोका शेट्टीच्या भावाचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चनसह खास उपस्थित राहिली होती. चुलत भावाच्या लग्नात ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या कुटुंबीयांबरोबर एन्जॉय करताना दिसले. तिघं ही कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर फोटो काढताना पाहायला मिळाले.

ऐश्वर्या राय-बच्चनच्या फॅन पेजवर तिच्या चुलत भावाच्या लग्नातला नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसह ‘कजरा रे’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी दोघांच्या सोबतीला लेक आराध्या बच्चनही डान्स करताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्याच्या डान्स व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अभिषेकला एकत्र डान्स करताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दोघांना एकत्र पाहून खूप खूप आनंद झाला आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, हा व्हिडीओ पाहून मनाला खूप बरं वाटलं. देवा तुझे आभारी आहे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बऱ्याच दिवसांनी ऐश्वर्याने जबरदस्त परफॉर्मन्स केला.”

दरम्यान, चुलत भावाच्या लग्नात ऐश्वर्या राय-बच्चनने लाइम कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. तसंच आराध्या ही आइवरी कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. तर अभिषेक गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. या लग्नातील तिघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. ऐश्वर्या व अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘पोन्नियिन सेलवन २’नंतर अभिनेत्रीच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही. तसंच अभिषेक बच्चन अलीकडेच ‘बी हॅप्पी’ चित्रपटात झळकला होता. आता लवकरच त्याचा ‘हाउसफुल्ल ५’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan and abhishek bachchan dance on kajra re song with daughter aaradhya video goes viral on social media pps