Aishwarya Rai & Salman Khan Breakup : सलमान खान व ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी एकेकाळी अनेकांच्या चर्चेचा विषय होती. सलमान खान ऐश्वर्या रायच्या चित्रपटांच्या सेटवर जाऊन, घरी जाऊन तिला त्रास द्यायचा वगैरे अशा अनेक गोष्टींची आजही चर्चा केली जाते. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शकांनी त्याबद्दल सांगितलं आहे.
बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. ऐश्वर्या राय व सलमान खान यांच्या रिलेशनशिपबद्दल ते म्हणाले, “मी तिला त्यावेळी पाठिंबा दिला. मी तिला सांगितलेलं की, काळजी करू नकोस. पण, तिला इंडस्ट्रीत काम न मिळण्याची भीती होती.”
ऐश्वर्या राय-सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल प्रल्हाद कक्कर यांची प्रतिक्रिया
ऐश्वर्याबद्दल पुढे दिग्दर्शक म्हणाले, “ब्रेकअप तिच्यासाठी चांगली गोष्ट ठरली. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल खूप बोललं गेलं. सलमान तिच्यावर हात उचलायचा, तो तिच्यासाठी खूप वेडा होता. मी त्याच बिल्डिंगमध्ये राहायचो. त्यामुळे मला माहीत आहे. तो खूप तमाशा करायचा. बिल्डिंगमध्ये येऊन आरडाओरडा करायचा. भिंतीवर डोकं आपटायचा. लोकांना त्यांचं रिलेशनशिप संपलं हे कळलं, त्याच्या खूप आधीच त्यांनी ब्रेकअप केलं होतं. त्या रिलेशनशिपमुळे तिला, तिच्या आई-वडिलांना आणि सगळ्यांनाच त्रास झालेला.”
ऐश्वर्याबद्दल प्रल्हाद यांनी सांगितलं की, “तिला ब्रेकअप झालं याचं दु:ख नव्हतं; तर इंडस्ट्रीत कोणीही तिची बाजू घेतली नाही, सगळ्यांनी सलमान खानला पाठिंबा दिला यामुळे तिला वाईट वाटलं होतं. पण, तिची बाजू खरी होती. तिला कोणीही पाठिंबा न दिल्यामुळे कोणावरही तिचा विश्वास नव्हता.”
ऐश्वर्या राय व सलमान खान यांचं २००२ मध्ये ब्रेकअप झालं. १९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ च्या वेळी त्यांचं रिलेशनशिप सुरू झालेलं. सलमान खानबरोबरच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायनं पुढे २००७ साली अभिषेक बच्चनबरोबर लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षांनी २०११ मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला.
