Aishwarya Rai Duplicate from Pakistan : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे चाहते जगभरात आहे. पण हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी एक पाकिस्तानी महिला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ही महिलादेखील खूप लोकप्रिय आहे. हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत असल्याने बरेचदा तिची चर्चा होत असते. तिचा आवाजही ऐश्वर्यासारखा आहे. एकदा तर ती ऐश्वर्यासारखी दिसते याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा तिने काय उत्तर दिलं होतं, ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे ऐश्वर्यासारखी दिसणारी पाकिस्तानी महिला?

हुबेहुब ऐश्वर्याप्रमाणे दिसणाऱ्या या पाकिस्तानी महिलेचं नाव कंवल चीमा आहे. कंवलचा जन्म पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे झाला. पण ती लहान असताना आई-वडिलांबरोबर रियाध, सौदी अरेबिया इथे गेली. तिचं शिक्षण रियाधमधील अमेरिकन आणि ब्रिटिश शाळेत झालं. तिथे ती दुसरी ते आठवी इयत्तेपर्यंत शिकली. मग ती तिचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी पाकिस्तानला परतली.

कंवल चीमाने सोडली नोकरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंवल चीमा एका २०० बिलियन डॉलर्स व्हॅल्यू असलेल्या कंपनीत नोकरी करत होती. पण तिने पाकिस्तानमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि समाजकार्यासाठी तिची नोकरी सोडली. यासंदर्भात डीएनएने वृत्त दिले आहे.

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लग्नबंधनात अडकले, लोकप्रिय गायिका आहे पत्नी; पाहा विवाह सोहळ्यातील फोटो

ऐश्वर्या रायशी होणाऱ्या तुलनेबद्दल कंवल चीमा म्हणते…

एकदा एका पाकिस्तानी पत्रकाराने कंवल चीमाला विचारलं होतं की लोक तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी करतात. आवाज आणि दिसणं दोन्ही ऐश्वर्या राय सारखं आहे, असं म्हटल्यावर कंवल चीमाने उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

कंवल चीमा (फोटो – इन्स्टाग्राम)

‘मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही,’ असं ती म्हणाली होती. लोक नेहमी तिची तुलना बॉलीवूड सुपरस्टार्सशी करतात, ही गोष्ट कंवल चीमा हिला अजिबात आवडत नाही. “तुम्ही माझे भाषण ऐकलं नाही, जर ऐकलंय तर मग माझ्या दिसण्याबद्दल प्रश्न का विचारता? भाषणाबद्दल बोला,” असं कंवल चीमा म्हणाली होती.

हेही वाचा – रान्या राव प्रत्येक दुबई ट्रिपमधून कमवायची तब्बल ‘इतके’ रुपये, एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी किती पैसे मिळायचे? तपासात माहिती आली समोर

कंवल चीमा काय करते?

कंवल चीमा ही ‘द इम्पॅक्ट मीटर’ नावाच्या एनजीओची संस्थापक आणि सीईओ आहे. या व्यासपीठाचा उद्देश गरजूंना मदत करणे आहे. ती थॅलेसेमिया मोहीम चालवते. तसेच तरुणांसाठी ‘सीखो आणि कमाओ’ नावाचा उपक्रमही राबवते.

रान्या रावने सोनं जॅकेटमध्ये लपवलं नव्हतं तर…; तस्करीबाबत मोठी माहिती आली समोर, अभिनेत्रीचं ४ महिन्यांपूर्वी झालंय लग्न

ऐश्वर्या रायसारखी दिसणारी बॉलीवूड अभिनेत्री

चीमा व्यतिरिक्त हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी एक बॉलीवूड अभिनेत्री आहे. ती म्हणजे स्नेहा उल्लाल. स्नेहाला ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने इंडस्ट्रीत लाँच केलं होतं. स्नेहा तिच्या करिअरपेक्षा ऐश्वर्यासारखी दिसते त्यामुळे चर्चेत राहिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai duplicate from pakistan kanwal cheema left high paid job for this work hrc