Aishwarya Rai Networth : ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली. परंतु तुम्हाला माहीत आहे का, ऐश्वर्या बॉलीवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. जाणून घ्या किती आहे तिची नेटवर्थ…

ऐश्वर्या राय दोन दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. १९९७ मध्ये तिने मणीरत्नम यांच्या ‘इरुवर’मधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं, तर तिने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिने मोजक्याच व वेगळं कथानक असलेल्या चित्रपटांत काम करण्याला पसंती दिली आहे. ऐश्वर्या रायला ‘दिल दे चुके सनम’ चित्रपटापासून प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने एकापेक्षा एक अशा चित्रपटांत काम केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. महत्त्वाचं म्हणजे कमी चित्रपटांत काम करूनही तिची नेटवर्थ तिचा नवरा अभिषेक बच्चनपेक्षाही जास्त आहे.

किती आहे ऐश्वर्या रायची नेटवर्थ?

जनसत्ताच्या वृत्तानुसार ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती लॉरिअल पॅरिससारख्या ब्रँडमधून कोट्यवधींची कमाई करते. यामुळेच कमी चित्रपटांत काम करूनही तिची नेटवर्थ जास्त आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार ऐश्वर्या रायची नेटवर्थ ८६२ कोटी इतकी आहे.

अभिषेक बच्चनची नेटवर्थ किती?

अभिषेक बच्चन नेटवर्थच्याबाबतीत पत्नी ऐश्वर्यापेक्षा मागे आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार त्याची नेटवर्थ ही एकूण २५० कोटी इतकी आहे. तर ऐश्वर्याची नेटवर्थ ८६२ इतकी आहे त्यामुळे ऐश्वर्या अभिषेकपैक्षा अधिक श्रीमंत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच परंतु, तिने हॉलीवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे देशाबाहेरही अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे. तर तिचे चाहते सध्या तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.