बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटातील कथेप्रमाणेच या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने ही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने नवे विक्रम बनवायला सुरुवात केली होती. आता प्रदर्शनानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास यशस्वी झाला आहे. आता अशातच या चित्रपटात विजय साळगावकर ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगणने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची आकडेवारी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात अजयने विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी कोणताही थराला जाणारा असा तो या चित्रपटात दाखवला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी ५० कोटींचा खर्च आला आहे. पण त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम ही अजयनेच घेतली असल्याचं आता समोर आलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याला लागली नवी ‘डायमंड’ नेमप्लेट, फोटो व्हायरल

‘दृश्यम’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयने साकारलेल्या विजय साळगावकर या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटातील अजयच्या कामाचं खूप कौतुकही केलं गेलं. आता पुन्हा एकदा तो त्याच व्यक्तिरेखात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘दृश्यम २’मध्ये विजय साळगावकर ही भूमिका साकारण्यासाठी अजयने ३० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. हे मानधन चित्रपटातील इतर कलाकारांच्या मानधनापेक्षा अनेक पटींना जास्त आहे.

हेही वाचा : प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम २’ची रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan charged huge amount to play lead character in drishyam 2 rnv