गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडला अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अनेक दृश्यांवर प्रेक्षक त्यांची नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. तसंच काही कलाकारांच्या वादग्रस्त वकतव्यांमुळे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडचा फटका आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांना बसला आहे. २-३ चित्रपट सोडल्यास तगडी स्टारकास्ट असूनही अनेक चित्रपट चांगली कमाई करण्यात अपयशी ठरले आहेत. या परिस्थितीवर आता अभिनेता अजय देवगणने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय देवगण सध्या त्याच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच नवे रेकॉर्ड्स बनवायला सुरुवात केली. गेली अनेक दिवस अजय आणि या चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अजयने बॉलिवूडच्या सद्य परिस्थितीवर त्याचं मत व्यक्त केलं. प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहात आणायचा असेल तर काय करावं लागेल याबद्दलचं त्याचं मत त्याने मांडलं.

हेही वाचा : विश्वसुंदरी मानुषी छिल्लर प्रसिद्ध व्यावसायिकाला करतेय डेट, कोण आहे तो? घ्या जाणून

अजय देवगणने ‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “बॉलिवूडला तीन-चार दरम्यान, ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु आहे.ची गरज आहे. अजय देवगण म्हणाला, ‘बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी एका विशिष्ट टॉनिकची आवश्यकता आहे. मला वाटतं बॉलिवूडला तीन-चार दृश्यम हवेत आणि याच टॉनिकची बॉलिवूडला गरज आहे.”

पुढे तो म्हणाला, “मला वाटतं मनोरंजक चित्रपट करणं फारसं सोपं नसतं. तुम्हाला अडीच तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवावे लागेल आणि प्रेक्षक खूप हुशार झाले आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना मनोरंजनाच्या नावाखाली काहीही दाखवू शकत नाही. ‘जेव्हा तुम्ही व्यावसायिक चित्रपटाच्या मनोरंजनाविषयी बोलता तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यावे लागते.”

आणखी वाचा : ‘दृश्यम २’साठी अजय देवगणने आकारलं ‘इतके’ कोटी मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क

दरम्यान, ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan opens up about audience choices of films rnv