बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराच्या दूताची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाच्या मानधनाबाबत त्याने मोठा निर्णय घेतला असल्याचा आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. वर्ल्ड वाईड कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर आता हा चित्रपट भारतात १०० कोटींचा गल्ला जमवण्याकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट १५० कोटी असून या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ३५ कोटी फी घेतली असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यावर आता निर्मात्यांनी भाष्य करत अक्षय कुमारच्या मानधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : Video: वयाच्या ५५व्या वर्षी अक्षय कुमारने केलं तांडव नृत्य, खिलाडी कुमारची एनर्जी पाहून नेटकरी थक्क

या चित्रपटाचे निर्माते अजित अंधारे यांनी ‘पिंकविला’शी बोलताना सांगितलं की, अक्षय कुमारने ‘ओह माय गॉड २’साठी एक रुपयाही घेतला नाही. उलट, हा चित्रपट बनवताना आर्थिक पातळीवरील जोखीम घेताना या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या पाठीशी तो उभा राहिला. अजित पांढरे म्हणाले, “अक्षय कुमार आणि आमचे खूप जुने संबंध आहेत. आम्ही आणि अक्षय दीर्घकाळ एकमेकांना ओळखतो. ‘ओएमजी’, ‘स्पेशल २६’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’च्या वेळेपासून आम्ही एकमेकांना समजून घेत आलो आहोत. अर्थपूर्ण आणि आशयगन स्क्रिप्ट असेल तर मी नेहमीच अक्षयच्या पाठीशी उभं राहत आलो आहे. अक्षयशिवाय हा धोका पत्करणं अशक्य होतं. तो या चित्रपटात आर्थिक आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सक्रियपणे सहभागी होता.”

हेही वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’मधील २० दृश्यांवर कात्री, वाढली निर्मात्यांची चिंता

याचबरोबर हा चित्रपट १५० नाही तर ५० कोटींपेक्षाही कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे असा खुलासाही त्यांनी केला. या चित्रपटात अक्षय कुमारव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar did not charge single rupee for omg 2 film know the reason rnv