बॉलीवूडची लोकप्रिय स्टारकिट्स राहा कपूरने आपल्या गोड अंदाजाने अनेकांची मनं जिंकली आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच मोठा चाहता वर्ग राहाचा झाला आहे. तिचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतो. राहा कधी पापाराझींना बाय, बाय करताना, तर कधी फ्लाइंग किस देताना दिसते. पण, राहाच्या आई-बाबाने म्हणजेच आलिया भट्ट-रणबीर कपूरने दुसऱ्या मुलाचं नाव ठरवलं आहे? हे तुम्हाला माहितीये का? नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आलिया भट्टने राहाच्या नावामागची गोष्ट सांगत मुलाच्या नावाचा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने जय शेट्टीच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी आलियाने राहाच्या नावामागची संपूर्ण गोष्ट सांगितली. राहाच्या जन्माआधीच मुलगी आणि मुलाच्या नावाचा आलिया-रणबीरने विचार केला होता. राहाच्या आधी दोघांना मुलाचं नाव खूप जास्त आवडलं होतं. आलिया भट्ट म्हणाली, “मी आणि रणबीर आम्ही दोघं उत्साही आई-बाबासारखे नावाबाबतीत चर्चा करायचो. आमच्या कुटुंबाचा एक ग्रुप आहे. तिथे सर्व कुटुंबातील सदस्यांना मुली व मुलाचं नाव सुचवण्यासाठी सांगितलं होतं. कारण आम्ही मुलगी किंवा मुलगा या दोन्हीसाठी तयार होतो. आम्ही एका मुलीचं नाव आणि एका मुलाचं नाव निवडलं होतं. त्यावेळी आम्हाला एका मुलाचं नाव खूप आवडलं होतं. आम्ही ठरवलं, हे नाव मुलासाठी खूप चांगलं आहे; ज्याचा मी आता खुलासा करू शकत नाही.”

पुढे आलिया भट्ट म्हणाली, “माझी सासू, रणबीरच्या आईने राहा नाव कसं वाटतं असं विचारलं? जर मुलगा झाला तर त्यालादेखील हे नाव शोभेल, असं त्या म्हणाल्या होत्या. राहा नाव हे मुलगी व मुलासाठी खरं चांगलं होतं. त्यांनी बरीच नावं सुचवली. पण रणबीर आणि मला राहा नाव आवडलं होतं. त्यामुळे आमच्याकडे दोन नावं ठरवली होती. त्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा नाव निश्चित झालं होतं.”

दरम्यान, मुलाच्या नावाचा खुलासा न केल्यामुळे सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘हम दो हमारे दो’ असं संपूर्ण कुटुंब करण्याचा दोघांचा विचार असल्याचं म्हटलं जात आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर, आलिया व रणबीर पुन्हा एकत्र लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दोघं पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘ब्रह्मास्त्र २’ चित्रपटातही आलिया व रणबीर दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt and ranbir kapoor already have a name in mind for raha kapoor brother pps