आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या बेबी गर्लची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. आलिया-रणबीर लेकीच्या गृहप्रवेशाची जोरदार तयारी करत आहेत. दोघंही आपल्या नव्या बंगल्यामध्ये कुटुंबासह लेकीला घेऊन जाणार आहेत. कपूर तसेच भट्ट कुटुंबांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. अशामध्येच सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या लेकीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण यामध्ये नेमकं किती सत्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा – सर्जरी झाल्यामुळे मालिकेमधून घेतला ब्रेक, आता ‘आई कुठे काय करते’मध्ये पुन्हा परतणार अरुंधती, पुढे काय घडणार?
सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या लेकीचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ती आलियाचीच लेक आहे असं बोललं जात आहे. एका फोटोमध्ये तर आलिया रुग्णालयाच्या बेडवर आपल्या मुलीसह झोपलेली दिसत आहे.
सतत व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये काहीच तथ्य नसल्याचं आता समोर आलं आहे. आलिया किंवा कपूर व भट्ट कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीने रुग्णालयातील तसेच अभिनेत्रीच्या लेकीचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला नाही. त्यामुळे सतत व्हायरल होणारे फोटो ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.
रणबीरचाही लहान मुलाबरोबर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्या लहान मुलाला मांडीवर घेऊन बसलेला दिसतो. पण हे रणबीर व आलियाचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिया व रणबीरच्या लेकीची पहिली झलक कधी पाहायला मिळणार याची त्यांची चाहते वाट पाहत आहेत.