एका बॉलीवूड अभिनेत्रीने आवडत्या अभिनेत्याबरोबर सगळी तत्वे बाजूला ठेवून वन नाईट स्टँड करायला तयार असल्याचं विधान केलं. ५० वर्षांची ही अभिनेत्री अविवाहित आहे. आवडत्या अभिनेत्याबरोबर रात्र घालवू शकते असं म्हणणारी ही अभिनेत्री म्हणजे अमीषा पटेल होय.

अमीषा पटेल तिच्या चित्रपटांबरोबरच अफेअर्समुळेही चर्चेत राहिली. विक्रम भट्ट, कणव पुरी, कुणाल गुमर, निर्वाण बिरला यांच्याशी अमीषाचं नाव जोडलं गेलं. पण अमीषाचा क्रश मात्र एक अभिनेता आहे.

अमीषा पटेलला कोणता अभिनेता आवडतो?

रणवीर अलाहाबादियाशी बोलताना अमीषाने तिला कोणता अभिनेता आवडतो, त्याबद्दल सांगितलं. “मला टॉम क्रूझ खूप आवडतो. जर तू त्याच्याबरोबर पॉडकास्ट करशील, तर मला त्या पॉडकास्टला नक्की बोलव. मला लहानपणापासून टॉम क्रूझ खूप आवडतो. माझ्या पेन्सिल बॉक्समध्ये त्याचा फोटो होता. माझ्या फाईल्समध्ये त्याचा फोटो होता. माझ्या खोलीत फक्त टॉम क्रूझची पोस्टर्स होती. तो नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच गमतीत म्हणते की तो एकमेव माणूस आहे ज्याच्यासाठी मी माझी सगळी तत्वे बाजूला ठेवू शकते. मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. जर मला विचारलं की मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते का? तर हो, मी करू शकते.”

अमीषा पटेलचं पहिलं प्रेम

अमीषा एका सिरियस रिलेशनशिपमध्ये होती. फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधीची ही गोष्ट आहे. अमीषाच्या एक्स बॉयफ्रेंडला तिचं लाइमलाइटमध्ये राहणं मान्य नव्हतं. त्यामुळे अमीषाने प्रेमाऐवजी करिअर निवडलं.

अमीषा पटेलचं करिअर

अमीषा पटेलने ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता हृतिक रोशनही होता. पहिल्याच चित्रपटातून अमीषाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने बदरी नावाचा सिनेमा केला होता. मग अमीषाने सनी देओलबरोबर गदर: एक प्रेम कथा चित्रपटात काम केलं. या चित्रपटाने अमीषा पटेलचं नशीब पालटलं. चित्रपट सुपरहिट झाला आणि अमीषा प्रचंड लोकप्रिय झाली. अमीषाने दोन वर्षांपूर्वी गदर २ हा चित्रपट केला. हा चित्रपट त्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करण्याऱ्या सिनेमांपैकी एक होता.