Ajitabh Bachchan Talks About Amitabh Bachchan : बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांची मूळ नावं ही वेगळी आहेत किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी आधी वेगळ्या नावाची निवड केलेली. या यादीत अक्षय कुमार, कियारा अडवानी ते अगदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावांचाही समावेश आहे. अमिताभ यांच्या वडिलांनी त्यांच्या जन्मानंतर त्यांच्यासाठी एका वेगळ्याच नावाची निवड केलेली. त्याबद्दल त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांनी माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांचं बच्चन हे आडनावदेखील त्यांच्या वडिलांनी त्यांचं मूळ आडनाव बदलून स्वीकारलं होतं आणि हे आडनाव लावणारे त्यांच्या घरातील ते पहिलेच व्यक्ती आहेत, असं अजिताभ यांनी सांगितलं आहे. अजिताभ बच्चन यांनी आर.जे सचिनबरोबर संवाद साधताना सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी हरिवंश राय बच्चन यांनी भारतात खोलवर रुजलेल्या जातिव्यवस्थेच्या विरोधात एक प्रतीकात्मक पाऊल म्हणून आपलं मूळ श्रीवास्तव हे आडनाव बदलून, बच्चन हे आडनाव स्वीकारलं.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार हरिवंश राय बच्चन यांनी सुरुवातीला फक्त लिखाणापुरतं बच्चन हे नाव वापरायला सुरुवात केलेली. बच्चन म्हणजे हिंदीत लहान मूल, असा अर्थ होतो. त्यांच्या आई त्यांना बच्चनवा अशा हाक मारायच्या, ज्यावरून त्यांना ही कल्पना सुचली. अजिताभ यांनी याबद्दल सांगितलं. त्यामुळे पुढे त्यांनी हेच आडनाव स्वीकारलं आणि बिग बी अधिकृतपणे हे आडनाव लावणारे त्यांच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती ठरले.

अमिताभ नाही तर ‘हे’ असणार होतं बिग बींचं मूळ नाव

अजिताभ यांनी अमिताभ यांच्या नावाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले, “वडिलांना माझ्या भावाचं नाव इन्कलाब, असं ठेवायचं होतं. कारण- त्या काळी ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. त्यामुळे त्यांना माझं नाव आझाद, असं ठेवायचं होतं.”

दरम्यान, अमिताभ बच्चन अधिकृतपणे बच्चन हे आडनाव लावणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले परंतु, याआधी जातिव्यवस्थेच्या विरोधात एक प्रतीकात्मक पाऊल म्हणून हरिवंश राय बच्चन यांनी हे आडनाव स्वीकारलं होतं.