Amrita Rao recalls facing Bollywood politics: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांना एका चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. २००३ ला प्रदर्शित झालेला ‘इश्क विश्क’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाला अनपेक्षित यश मिळाले होते.

दोन्ही कलाकारांना या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने यश मिळाल्यानंतर बॉलीवूडमधील इतर कलाकारांकडून कशी वागणूक मिळाली, याबद्दल सांगितले.

“आम्ही खूप..”

द रणवीर शोला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली, “मला आठवतं की, ‘इश्क विश्क’ प्रदर्शित झाल्यानंतर मला आणि शाहिदीला फेस ऑफ द इयर, सुपरस्टार ऑफ टुमॉरो आणि असे काही पुरस्कार मिळाले होते. एका मॅगझिनच्या मुखपृष्ठासाठी आमचे फोटोशूट होणार होते.

ठमी अवॉर्डसह बसले होते. शाहिद माझ्यामागे उभा राहिला होता. आमच्या बाजूलाच खूप प्रसिद्ध अशा दोन अभिनेत्री बसल्या होत्या. दुसऱ्या बाजूला खूप लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री बसले होते. आम्ही सगळे एकाच फ्रेममध्ये होतो आणि तो फोटो त्या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर छापला जाणार होता.”

अमृता पुढे म्हणाली, “आम्ही खूप आनंदी होतो. पहिल्यांदा मॅगझिनच्या मुखपृष्ठावर माझा फोटो येणार होतो. जेव्हा मी ते कव्हर पाहिले. ते सर्व फोटोशॉप केले होते. माझा फोटो सर्वांत मागे होता आणि माझ्याऐवजी दुसरी अभिनेत्री पुढे होती. फोटोशूटच्या दिवशी जसा फोटो काढला होता, तसा फोटो तो नव्हता. महत्त्वाचे म्हणजे मला याबद्दल काहीही कळवले नव्हते.”

अभिनेत्री असेही म्हणाली, “मला आधी वाईट वाटायचे. माझ्याबरोबरच या गोष्टी का घडतात, असे वाटायचे. पण, आता मला असे वाटते की, अशा पद्धतीचे राजकारण सगळीकडे होते. आपल्या शाळा, कॉलेज इतकेच काय तुमच्या सोसायटी मीटिंगमध्येदेखील हे घडते. तर, अशा राजकारणाला सामोरे जाण्याची तुम्ही तुमची तयारी केली पाहिजे. कारण- हे जग सतत तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत राहणार.”

“मी बारीक असल्याबद्दल लोक मला…”

बारीक असण्याबद्दल इंडस्ट्रीतील लोक तिला काय बोलायचे, याबद्दलचा किस्सा सांगताना अमृता म्हणाली, “मी बारीक असल्याबद्दल लोक मला बोलत असत; पण ते कौतुकानं कधीही बोलत नसत. अशा वेळी मला माझ्या मावशीनं दिलेला सल्ला आठवतो. ती बारीक असताना तिची थट्टा केली जात असे. मात्र, जेव्हा तिनं तिचं वजन वाढवलं, तेव्हा वाढलेल्या वजनावरूनही लोक तिला बोलू लागले होते.”

‘इश्क विश्क’नंतर अमृतानं फराह खानच्या ‘मैं हूँ ना’, सूरज बडजात्या यांचा ‘विवाह’ व सुभाष कपूर यांच्या ‘जॉली एलएलबी’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. नुकतीच ती ‘जॉली एलएलबी ३’मध्येदेखील दिसली आहे.