दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने आधीच प्रेक्षक नाराज आहेत. आता अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणखी एक फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी निर्माते गेले काही दिवस उत्कृष्ट दिग्दर्शकाचा शोध घेत होते. या दरम्यान त्यांनी अनीस बज्मी यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा केली होती. पण त्यांनी निर्मात्यांची ही ऑफर धुडकावून लावली असल्याचा समोर आलं आहे.

आणखी वाचा : “लोक वाईट बोलतात याचा अर्थ न्यासा…”; लेकीला ट्रोल केलं जाण्याबद्दल काजोलने सोडलं मौन

अनीस बज्मी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या ऑफरबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मला ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा झाली होती ही गोष्ट खरी आहे. त्याचप्रमाणे मी ही ऑफर नाकारली हेही खरं आहे. मी सध्या माझ्या इतर चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र आहे. त्यातून वेळ काढून ‘हेरा फेरी ३’ चं दिग्दर्शन करणं मला सध्या शक्य नाही. इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने ‘हेरा फेरी ३’साठी मी माझ्या तारखा सध्या देऊ शकत नाही. माझं सगळं शेड्युल व्यवस्थित लागलं की मी यावर स्पष्टपणे भाष्य करू शकेन.”

हेही वाचा : “चित्रपटात कोणाला घ्यायचं…”; परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’च्या कास्टिंगवर केलं भाष्य

अनीस बज्मी यांनी नुकतंच ‘भूल भुलैय्या २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट तुफान चालला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १८५ कोटी रुपयांची कमाई केली. तसंच अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाबरोबरच त्यांनी ‘नो एन्ट्री’ आणि ‘वेलकम’ या सुपरहिट चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे आता ते ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण अद्याप त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला नकार दिला असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anees bazmee rejected hera pheri 3 offer because of his busy schedule rnv
First published on: 30-11-2022 at 11:39 IST