बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. या बाळाचे नाव ‘वायू’ ठेवल्याचेही सोनमने जाहीर केलं. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. तिच्या बाळाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच दिसली. आता अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांनी त्यांच्या नातवाला एक खास भेट देत त्याचे स्वागत केल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘पाताळ लोक’चा दुसरा सीझन कधी येणार? अभिनेते जयदीप अहलावत यांनी दिली अपडेट, म्हणाले…

अभिनेत्री सोमन कपूर हिने तिच्या इन्स्टाग्राम स्ट्रोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ताट वाटी यांचा सेट दिसत आहे. या फोटोत लिहीलं आहे, “वेलकम बेबी वायू कपूर अहुजा.” हा सेट अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांनी वायूला भेट म्हणून दिली आहे. निळ्या रंगाच्या ताटात पिवळ्या रंगाचा गोल असं यावर डिझाईन आहे. याचे खास कारण म्हणजे वायू या नावाचा या डिझाईनशी शास्त्रीय संबंध आहे. या निळ्या रंगाच्या ताटासोबत एक भांडं आणि दोन वाट्याही आहेत.

ही भेट खास आजी आजोबांकडून वायूला दिली गेली आहे. सोनम कपूर, सुनिता कपूर तसेच रिया कपूर यांनी या फोटोला कमेंट्स करत ही भेट त्यांना खुप आवडल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सोनम कपूर वर्कआऊटचा शुभारंभ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

प्रेग्नन्सीदरम्यान अभिनेत्री सोनम कपूर चर्चेत होती. सोनमच्या बेबी शॉवर आणि मॅटर्निटी फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती. तिच्या बाळाला पाहण्यासाठी चाहतेही आतुर होते. सोनमने वायुला जन्म दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor and sunita kapoor gave a special gift to their first grandchild rnv