अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अनुष्काने तिच्या मेहनत आणि अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केले आहे. ती आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्काचा जन्म १ मे १९८८ रोजी उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे झाला होता. तिने छोट्या जाहिरातींमध्ये काम करून करिअरला सुरुवात केली होती. अभिनेत्री होण्यापूर्वी अनुष्का मॉडेल होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुझं आयुष्य फक्त पार्टी आणि मुली…’, जिया खानने सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीबद्दल केलेले खुलासे; म्हणालेली, “मला गरोदर…”

फार कमी लोकांना माहीत असेल की अनुष्का शर्माने शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापूर्वी आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिचा जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ‘थ्री इडियट्स’साठी ऑडिशन देताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने नाकारलेल्या सौंदर्य प्रसाधनांच्या कोट्यवधींच्या जाहिराती, कारण सांगत म्हणाली होती, “गोरी त्वचा…”

अनुष्का शर्माच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे. अनुष्काने ‘पीके’च्या सेटवरील लोकांना ‘थ्री इडियट्स’साठी ऑडिशन दिल्याचा व्हिडीओ दाखवला. जेव्हा तिने आमिर खान आणि राज कुमार हिरानी यांना व्हिडीओ दाखवला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. आमिर खान अनुष्का शर्माचे कौतुक करत असतानाच काही सीन्सवर तो हसतानाही दिसत आहे. दुसरीकडे राज कुमार हिरानी यांनाही माहीत नव्हते की अनुष्काने त्यांच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती.

ऑडिशन व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील एक डायलॉग म्हणताना दिसत आहे, जो त्या चित्रपटातील अभिनेत्री ग्रेसी सिंगने म्हटला होता. तिच्या वाढदिवसानिमित्त हा ऑडिशन व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma audition for three idiots check amir khan reaction viral video hrc