महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली होती. याचप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता, यावेळी अनुष्का शर्माने आपल्या बॉडीगार्डसह बाईकने प्रवास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सेटवर सोडतोस का?” अनोळखी व्यक्तीबरोबर ‘बिग बीं’ची बाईक राईड, नेटकरी म्हणतात…

अनुष्काचा हा व्हिडीओ पापाराझींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्री डबिंग स्टुडिओमध्ये कामासाठी आली होती, परंतु जुहू परिसरात झाड पडल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. या वेळी अनुष्काने बॉडीगार्ड सोनूची मदत घेत बाईकने प्रवास केला, परंतु या पापाराझींनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा व्हायरल व्हिडीओमध्ये बॉडीगार्डसह विनाहेल्मेट प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी तिला वाहतुकीचे नियम सांगण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर काही जणांनी थेट मुंबई पोलिसांना टॅग करीत यांच्यावर कारवाई करा अशी मागणीसुद्धा केली आहे.

हेही वाचा : तब्बल ३ वर्षांनी विकी कौशलचे बॉक्स ऑफिसवर पुनरागमन; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हे’ चार चित्रपट

व्हायरल व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका युजरने लिहिले आहे की, “या दोघांनी हेल्मेट कुठे घातले आहे? मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्या!” दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे, “इतर वेळी ही आपल्याला ज्ञान वाटत असते परंतु आज स्वत: हेल्मेटशिवाय प्रवास करीत आहे.”

दरम्यान, मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडपासून काही काळ दूर होती परंतु आता लवकरच ती, ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma two wheeler bike ride with bodyguard fans complain directly to mumbai police sva 00