बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. अरबाजची बहीण अर्पिता खानच्या घरी अरबाज व शूरा खानच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत अरबाज व शूराचा लग्नसोहळा पार पडला. अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला त्याचा मुलगा अरहान खानही उपस्थित होता. या लग्नादरम्यानचे अरहानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला रवीना टंडनने मुलांसह लावली हजेरी, शुरा खानशी तिचं कनेक्शन काय? जाणून घ्या

शूराने लग्नासाठी सब्यसाचीचा भरतकाम केलेला केशरी रंगाचा ऑर्गेन्झा लेहेंगा घातला होता, तर अरबाजने त्याच डिझाइनचा कोट परिधान केला होता. या लग्नात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते अरबाजचा मुलगा अरहानने. अरहानने वडिलांच्या लग्नात काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या लग्नसोहळ्यादरम्यान अरहान खूप आनंदी दिसला. लग्नात अरहानने वडील अरबाज व सावत्र आई शूराबरोबर अनेक फोटोही काढले आहेत.

हेही वाचा-

दरम्यान, अरहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरहान वडिलांच्या दुसऱ्या लग्नात गिटार वाजवताना दिसत आहे; तर अरबाज अरहानचा व्हिडीओ काढताना दिसून आला. अरहानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर या लग्नात त्याने डान्सही केला.

कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अरबाज व शूराचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला रवीना टंडन व तिची मुलगी राशा थडानी यांनीही हजेरी लावली होती. या व्यतिरिक्त फराह खान, साजिद खान आणि रितेश व जिनिलिया देशमुख त्यांच्या मुलांबरोबर उपस्थित होते. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arhaan khan stunning performance in his father arbaaz khan second marriage video viral dpj