Arjun Kapoor Tattoo : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी तो आपल्या अभिनयामुळे नाही तर एका खास कारणामुळे चर्चेत आहे. अर्जुनने आपली दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या स्मरणार्थ एक खास टॅटू आपल्या खांद्यावर गोंदवला आहे.
अर्जुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या टॅटूचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सांगितले की, त्याने ‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या पूर्वसंध्येला हा टॅटू गोंदवला असून तो आपल्या आईला समर्पित केला आहे. अर्जुनला असे वाटते की, आजवर त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करताना त्याची आई सदैव त्याच्या मागे उभी राहिली आहे. अर्जुनच्या खांद्यावर ‘रब राखा’ असे शब्द गोंदवलेले आहेत.
हेही वाचा…“तुझा काय XX…”, प्रसिद्ध गायिकेविषयी अनु मलिकने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलेलं?
अर्जुनची भावनिक पोस्ट
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “रब राखा – ईश्वर नेहमी तुमच्याबरोबर आहे. माझी आई चांगल्या आणि वाईट काळातसुद्धा हे वाक्य नेहमी म्हणायची. आजही मला वाटतं की, माझी आई माझ्याबरोबर आहे, ती माझ्यावर लक्ष ठेवून मला मार्गदर्शन करत आहे.”
अर्जुनने पुढे लिहिले, “‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या आधी मी हा टॅटू गोंदवला आहे. आता जेव्हा मी माझ्या आयुष्यातील नव्या टप्प्यावर आहे, तेव्हा मला वाटतं की माझ्या आईने मला पाठिंबा दिलाय आणि ती मला सांगत आहेत की, या युनिव्हर्सची माझ्यासाठी काहीतरी योजना आहे. आई, मला श्रद्धा शिकवल्याबद्दल धन्यवाद, रब राखा, नेहमीच.”
चाहत्यांची आणि सेलिब्रिटींची प्रतिक्रिया
अर्जुनच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने हृदयाच्या इमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. एका चाहत्याने लिहिलं, “एक चक्र पूर्ण झालं.” तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं, “आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर टॅटू.” आणखी एका चाहत्याने लिहिलं, “खूपच अप्रतिम.”
हेही वाचा…अभिनेत्री कश्मीरा शाहने अपघातानंतर स्वतःचा पहिला फोटो केला पोस्ट; म्हणाली, “माझा चेहरा…”
‘सिंघम अगेन’चा दमदार परफॉर्मन्स
अर्जुन कपूरच्या ‘सिंघम अगेन’ने २० दिवसांत २३५.१५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. अर्जुन कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd