बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमारचा भीड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, सध्या राजकुमार राव एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आला आहे. ‘तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’ असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी राजकुमार रावला ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला राजकुमारनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “ती सगळा राग माझ्यावर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारकडे केली होती ट्विंकल खन्नाची तक्रार

राजकुमारला मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. ‘तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’ या प्रश्नाला उत्तर देत राजकुमार म्हणाला, नाही, ‘मी प्लास्टिक सर्जरी केली नाही.’ पुढे तो म्हणाला, ‘अशा अफवा वाचून चेहऱ्यावर हसू येतं. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत हे मला आवडते.’

हेही वाचा- ‘तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?’ नेटकरींच्या प्रश्नावर राजकुमार रावचे भन्नाट उत्तर, म्हणाला…

राजकुमारचा नवा चित्रपट ‘भीड’ प्रेक्षकांच्या भेटीला

राजकुमार रावचा नवा चित्रपट भीड नुकताच २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भीड या चित्रपटात दिया मिर्जा आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटात कोरोनाच्या काळात देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच राजकुमार राव जान्हवी कपूरसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय एक SRI चित्रपट आहे जो सध्या निर्मितीच्या टप्प्यावर आहे. तो सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्यावर अभिनेता लवकरच काम सुरू करणार आहे.

हेही वाचा- “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

राजकुमार रावला दिसण्यावरुन अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. यापूर्वी एका मुलाखतीत राजकुमार रावने यावर भाष्य केले होते. राजकुमार राव म्हणाला, “होय, मला अनेक वेळा नकारांचा सामना करावा लागला आहे. मला किती वेळा सांगण्यात आले आहे की मी उंच नाही. माझे व्यक्तिमत्त्व योग्य नाही. माझ्या भुवया योग्य आकारात नाहीत. मी विचित्र दिसत आहे. पण मला वाटतं अभिनय आणि काम हीच गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाते बाकी काही नाही. तुमची प्रतिभा बोलते आणि दुसरे काही नाही

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor rajkummar rao on plastic surgery rumours slams trolls dpj