बहुचर्चित ‘गदर २’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘गदर २’च्या निमित्ताने सनी देओल आणि अमीषा पटेल यांची जोडी प्रेक्षकांना तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अभिनेत्री अमीषा पटेलने २००१ मध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले.

हेही वाचा : Video : “पाजी तुस्सी…”, ‘गदर २’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सनी देओल भावुक; अमीषा पटलेने पुसले डोळे, व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडमधील काही लोकांना गदरमध्ये अमीषा पटेल ‘जीते’ पात्राच्या आईची भूमिका साकारू शकेल की नाही याबाबत खात्री नव्हती. अमीषा म्हणाली, “मी ‘गदर’ चित्रपटात आईची भूमिका साकारण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मी त्या लोकांची आता नावे घेणार नाही. पण, ते लोक मला बोलायचे तू सध्या कॉलेजमधल्या मुलींच्या भूमिका करत असताना एका आईची भूमिका कशी करशील? तू ही आईची भूमिका चांगली साकारू शकणार आहेस का? तेव्हा, मी हृतिक रोशन आणि सलमान खान यांच्या चित्रपटात कॉलेज तरुणीची भूमिका साकारत होते.”

हेही वाचा : Gadar 2 Trailer : “…तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल”, ‘गदर २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलच्या जबरदस्त ॲक्शनने वेधले लक्ष

अमीषा पुढे म्हणाली, “सुरुवातीला मी सकिनाच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. सलग ६ महिने, दररोज १२ तास मी काम या भूमिकेसाठी काम करायचे. या काळात अनिल शर्मा यांनी खूप मदत केली. ‘गदर’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ‘गदर’ला काहीजण ‘गटर’ बोलायचे. ते ऐकून मला फार वाईट वाटायचे. यासाठी मी जास्तीत जास्त मेहनत घेत होते.”

हेही वाचा : “तिने मला कायम पाठिंबा…”, मानसी नाईकने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“‘गदर २’ ची चर्चा सुरु झाल्यावर पुन्हा काही लोक माझ्या आईच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करू लागले. आम्ही अनेक लूक टेस्ट करून ‘गदर २’ साठी माझा लूक ठरवला. शेवटी एक दिवशी अनिल शर्मा यांनी मला मेसेज केला ‘माझी सकिना मला परत मिळाली…” असे अमीषा पटेलने सांगितले. दरम्यान १९७१ च्या कथानकावर आधारित असलेला ‘गदर २’ चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.