Unknown Facts of Bollywoods Biggest Star: राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार मानले जातात. पण, त्याआधी दिलीप कुमार यांनी बॉलीवूडमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, त्याचदरम्यान आणखी एक अभिनेता प्रसिद्धीस येत होता.

मुळचे मेरठमधील भारत भूषण यांना १९५० च्या दशकात लोकप्रियता मिळत होती. ‘बैजू बावरा’, ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र, त्यांची प्रसिद्धी फार कमी काळासाठी टिकली. निर्माते म्हणून त्यांनी काही चित्रपटांत गुंतवणूक केली होती, त्यामध्ये त्यांना अपयश आलं. या सगळ्यात लोकप्रियता कमी झाली. असे म्हटले जाते की, त्यांना त्यांचा बंगला, गाड्या व पुस्तकेदेखील विकावी लागली होती. नंतर ते मालाडमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. १९९२ साली त्यांचा मृत्यू झाला.

अमिताभ बच्चन म्हणालेले…

अमिताभ बच्चन यांनी एकदा भारत भूषण यांच्याविषयी वक्तव्य केले होते. एका सकाळी अमिताभ बच्चन कामावर जात असताना त्यांना भारत भूषण बस थांब्यावर बसची वाट बघताना दिसले. २००८ मध्ये अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगाबाबत खुलासा केला होता. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या प्रसंगाबद्दल लिहिले होते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, भारत भूषण यांच्यासाठी गाडी थांबवावी हे धाडस माझ्यात नव्हते, त्यामुळे भारत भूषण यांना अपमानित वाटेल, याची भीती त्यांना वाटली होती. पण, यामुळे त्यांच्या हे लक्षात आले की प्रसिद्धी व यश हे किती कमी काळासाठी असू शकतं, याची त्यांना जाणीव झाली.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, “मी सांताक्रुझवरून कामासाठी माझ्या गाडीने जात होतो, त्यावेळी मी ५० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते भारत भूषण यांना पाहिले. ते बसची वाट पाहत रांगेत उभे होते. इतर सामान्य नागरिकांसारखेच ते वाटत होते. तिथे गर्दी होती, पण ते एकटे, दुर्लक्षित वाटत होते. त्या गर्दीतील कोणीही त्यांना ओळखले नाही. ते कोण होते, हे कोणालाही माहीत नव्हते.

मला त्यांना ते जिथे जाणार होते तिथे त्यांना सोडावे असे वाटत होते. मात्र, त्यांना विचारण्याची हिंमत नव्हती. मला भीती वाटत होती की माझ्यामुळे त्यांना अपमान झाल्यासारखे वाटेल. त्यानंतर पुढे निघालो. मात्र, तो प्रसंग, ते चित्र माझ्याबरोबर कायम राहिले. हे कोणाबरोबरही होऊ शकते.

पत्रकार अली पिटर जॉन यांनी भारत भूषण यांच्या चढउताराविषयी एक आर्टिकल लिहिले होते. त्यांनी लिहिले होते की, दिलीप कुमार व नर्गिस हे बैजू बावरा या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. मात्र, त्यांनी त्यांच्या खासगी समस्यांमुळे एकत्र काम करण्यास नकार दिला. त्यामुळे बैजू बावरा चित्रपटात भारत भूषण व मीना कुमारी यांना कास्ट करण्यात आले. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. मात्र, काही प्रॉडक्शनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना त्यांचे सर्व पैसे गमवावे लागले आणि ते दिवाळखोर झाले. एका खोलीत राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. उदरनिर्वाहासाठी छोट्या भूमिकांमध्ये काम करावे लागले. अखेरीस त्यांना मालाडमधील एका लहान फ्लॅटमध्ये राहावे लागले. तिथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात फक्त आठ लोक उपस्थित होते.”