Why Sridevi Stopped Talking To Boney Kapoor: बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या प्रेम कहाण्यांबद्दल बोलले जाते. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी व निर्माते बोनी कपूर यांच्या लव्ह स्टोरीची देखील अनेकदा चर्चा होताना दिसते.

त्यानंतर ती माझ्याशी…

लग्न झालेले असतानाही बोनी कपूर हे श्रीदेवींच्या प्रेमात पडले होते. पण, जेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवींना प्रपोजे केले तेव्हा अभिनेत्रीने त्यांच्याशी बोलणे बंद केले होते. ६ महिने श्रीदेवी बोनी कपूर यांच्याशी बोलल्या नव्हत्या. कारण-ते त्यांचे आधीच लग्न झालेले होते आणि त्यांना दोन मुले होती.

एबीपीला दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी यासंबंधी खुलासा केला होता. बोनी कपूर म्हणालेले, “श्रीदेवीची लग्नासाठी मनधरणी करण्यासाठी मला ५-६ वर्षे लागली. जेव्हा मी तिला प्रपोज केले तेव्हा तिला धक्का बसला होता. ती म्हणाली होती की तुझे लग्न झालेले आहे आणि तुला दोन मुले आहेत. तू मला हे कसं विचारू शकतोस. त्यानंतर ती माझ्याशी ६ महिने बोलली नव्हती.

१९९५ मध्ये गोष्टी बदलल्या. श्रीदेवी यांची आई आजारी पडली. त्यावेळी बोनी कपूर श्रीदेवींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर त्यांच्यातील जवळीकता आणखी वाढली. श्रीदेवी माझ्याकडे आकर्षित होऊ लागली, असे त्यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले होते.

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच श्रीदेवींचे अनेक किस्सेदेखील सांगतात. होळीला बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये श्रीदेवी हसत असल्याचे दिसले. तसेच त्यांच्या पाठीवर बोनी कपूर यांचे नाव रंगाने लिहिले होते. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळाले.

श्रीदेवी व बोनी कपूर यांनी २ जून १९९६ साली शिर्डीमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुली आहेत. जान्हवी कपूर व खुशी कपूर या त्यांच्या दोन्ही मुली चित्रपटसृष्टीत काम करताना दिसत आहेत. खुशी कपूर नुकतीच ‘नादानियां’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला मोठ्या टीकेचा सामाना करावा लागला. तर जान्हवीने २०१८ साली ‘धडक’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना’, ‘बवाल’, ‘गुड लक जेरी’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘तेरी बातों मे उल्झा ऐसा जिया’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. दरम्यान, श्रीदेवींचे २०१८ मध्ये दुबई येथे निधन झाले.