Cannes Festival Urvashi Rautela Torn Dress : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५’ची. अनेक कलाकार मंडळी या ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर आपली अदाकारी दाखवतात आणि आपल्या नानाविध लूक्समधील सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतात. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या हटके आणि क्लासी आऊटफिट्सच्या चर्चा संपूर्ण जगभरात रंगल्याच्या पाहायला मिळतात. अशातच बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर दिसून आली. आपल्या अनेक लूक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी उर्वशी यंदा मात्र तिच्या लूकमुळे ट्रोल होत आहे.
उर्वशी यंदाच्या ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर क्लासी ब्लॅक आऊटफिट फ्लॉन्ट करताना दिसली. पण नेहमी सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवणारी उर्वशी तिच्या यंदाच्या ‘कान्स’मधील लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उर्वशीने ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ब्लॅक गाऊन परिधान केला होता. त्यात ती सुंदर दिसत होती. पण जेव्हा तिनं कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यास सुरुवात केली, तेव्हा तिचा गाऊन डाव्या हाताच्या काखेत फाटलेला असल्याचं स्पष्ट दिसलं. उर्वशीच्या या फाटलेल्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
७८ व्या वार्षिक ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘ओ एजेंट सीक्रेटो’च्या स्क्रीनिंगमध्ये उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर दिसून आली. यावेळी काळ्या सिल्क सिल्क गाऊनमध्ये उर्वशी फार सुंदर दिसत होती. यावेळी उर्वशी रेड कार्पेटवर आली आणि तिनं वेगवेगळ्या पोज देण्यास सुरुवात केली. पण तिनं जेव्हा सर्वांना अभिवादन करण्यासाठी हात उंचावला तेव्हा उर्वशीचा ड्रेस डाव्या हाताच्या काखेत फाटला असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले.
Urvashi Rautela :- First Indian to have a torn dress at Cannes? pic.twitter.com/ZqePMasB4K
— raman (@Dhuandhaar) May 18, 2025
उर्वशीने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या फाटलेल्या गाऊनचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स व्यक्त केल्या आहेत. एकाने “कान्समध्ये फाटलेला पोशाख परिधान करणारी उर्वशी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे” असं म्हटलं. तर दुसऱ्याने “हे दुर्दैवी आहे. ती पूर्णपणे भ्रमात आहे, तिच्यासाठी हा एक चांगला रेड कार्पेट क्षण असू शकला असता” असं म्हटलं. तर आणखी एकाने “आता आपण उर्वशीच्या ‘कान्स प्रवासा’बद्दल एक तासाचा पॉडकास्ट पाहणार आहोत” असं म्हणत फिरकी घेतली आहे.
दरम्यान, ‘कान्स’च्या पहिल्या दिवशी उर्वशी रौतला रंगीबेरंगी ड्रेसमध्ये पोहचली होती. यावेळी तिच्या हातात पोपटाच्या डिझाईनची पर्स होती. या पर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यामुळे अभिनेत्रीलाही टीकेचा सामना करावा लागला होता. तर आता उर्वशी तिच्या दुसऱ्या लूकमुळेही पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या लूकमधील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोला मात्र चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.