Chhaava Box Office Collection Day 22: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन २२ दिवस झाले आहेत आणि चित्रपटाची कमाई अजूनही कोटींमध्ये आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, हे त्याच्या कमाईच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. २२ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. २२ व्या दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. ७ मार्चला तेलुगूमध्ये ‘छावा’ रिलीज करण्यात आला, त्याच्या कमाईची आकडेवारीही समोर आली आहे. ‘छावा’ने चित्रपटाने रिलीजपासून आतापर्यंत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या सिनेमाने २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ पूर्णपणे संपवला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे. रिलीजला तीन आठवडे पूर्ण होऊनही ‘छावा’ची कमाई कोटींमध्ये आहे. या सिनेमाची कमाई अशीच होत राहिली तर तो २८ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘सिकंदर’ला टक्कर देऊ शकतो, अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा – “काय मूर्खपणा करताय, लगान चित्रपट एक दिवसही चालणार नाही”; जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य; आमिर खानचा खुलासा

‘छावा’ सिनेमाचे तीन आठवड्यांचे कलेक्शन

‘छावा’ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, दुसऱ्या आठवड्यात ‘छावा’ची कमाई १८०.२५ कोटी रुपये होती. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ८४.०५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा – अनुराग कश्यपचे चाहते आहात? त्याचे ‘हे’ १० चित्रपट एकदा तरी नक्की पाहा, OTT वर आहेत उपलब्ध!

‘छावा’ सिनेमाची २२ व्या दिवसाची कमाई

‘छावा’च्या २२ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ ने रिलीजच्या २२ व्या दिवशी ८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदीमध्ये ६.२५ कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये २.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

‘छावा’चे २२ दिवसांचे भारतातील एकूण कलेक्शन आता ४९२.०५ कोटी रुपये झाले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava box office collection day 22 chhatrapati sambhaji maharaj laxman utekar film hrc