भारतीय संघ सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रलियामध्ये आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा माजी कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी विराट ऑस्टेलियामधल्या हॉटेलमध्ये राहत होता, त्या हॉटेलच्या त्याच्या खोलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या धक्कादायक प्रकारावर त्याने आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने संताप व्यक्त केला होता. तिने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत संपूर्ण या गोष्टीचा निषेध जाहीर केला होता. यावरुन हॉटेल व्यवस्थापनावर टीका देखील करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिने या पोस्टमध्ये “पूर्वीही अनेकदा चाहत्यांनी सहानुभूती आणि दयामाया दाखवलेली नाही, याचा अनुभव आम्हाला आहे. पण आज जे काही घडलंय ते खूप जास्त त्रासदायक आहे. जे लोक म्हणतायत की तुम्ही तर सेलिब्रेटी आहात मग असं होणारच, त्यांना मी सांगू इच्छिते, की एखाद्याच्या खासगी आयुष्यामध्ये अतिप्रमाणात डोकावणे चुकीचे असते. तुम्ही अशा वर्तनातून त्या व्यक्तीचा अपमान करत आहात आणि त्याच्या प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. ही स्थिती तुमच्यावरही ओढवली जाऊ शकते. प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे. जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं जात असेल तर मग मर्यादा कुठे आहेत? याचाही विचार व्हायला हवा.” असे लिहिले होते.

आणखी वाचा – “एकामागोमाग एक चित्रपट करून अक्षय कुमारबरोबर स्पर्धा करतेस का?” रकुल प्रीत म्हणाली…

अभिनेत्री दिया मिर्झाने या मुद्द्यावर भाष्य करत हॉटेल्समध्ये राहायला भीती वाटत असल्याचे सांगितले. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मागच्या दशकामध्ये अभिनेत्रीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढून त्याचा गैरवापर झाल्याचे मी ऐकून होते. तेव्हापासून मी कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याअगोदर मला दिलेली खोली नीट निरखून पाहते. हॉटेलमध्ये आल्यानंतरच मी तेथील व्यपस्थापकांना खोली द्यायला लावते आणि स्वत:हून सर्वप्रथम त्या खोलीत कॅमेरे लपवले नसल्याची खात्री करुन घेते. मी खूप जास्त सावधगिरी बाळगते.”

आणखी वाचा – अथिया शेट्टीच्या वाढदिवशी केएल राहुलने केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या असण्यानं…”

२०२० मध्ये प्रदर्शित दीपिका पदुकोणचा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये दिया मिर्झाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. गेल्या काही वर्षांपासून ती मनोरंजन विश्वापासून काहीशी लांब राहिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza revealed the reason for feeling scared while staying in a hotel yps