सध्या बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने यावर्षीची सुरुवात चांगली झाली. पाठोपाठ ‘गदर २’, रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘जवान’ हे चित्रपटही चांगलेच गाजले. रणबीरच्या ‘तु झुटी मै मक्कार’ने पण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता सुद्धा रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार दिवसांत चित्रपटाने जगभरात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटावर टीका होत आहे, तर काहींनी चित्रपटातील रणबीरच्या कामाची प्रशंसा केली आहे. रणबीरबरोबरच आणखी एका कलाकाराचे प्रचंड कौतुक आपल्याला ऐकायला मिळत आहे. नुकतेच त्या अभिनेत्याने ‘अ‍ॅनिमल’मधील चित्रीकरणादरम्यानची एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो अभिनेता त्याच्या पिळदार शरीरयष्टीमागील रहस्य सांगत आहे.

आणखी वाचा : “आपण प्रेक्षक आहोत आणि…” अदनान सामीची ‘अ‍ॅनिमल’बद्दलची पोस्ट चर्चेत; बिग बींच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटांचा केला उल्लेख

हा अभिनेता म्हणजे ‘अ‍ॅनिमल’मध्ये अब्रार हक हा खलनायक साकारणारा बॉबी देओल. चित्रपटातील बॉबी देओलचे पात्र सगळ्यांनाच प्रचंड आवडले असून यात बॉबीचे आणखी सीन हवे असल्याचंही म्हंटलं आहे. या चित्रपटासाठी बॉबीने प्रचंड मेहनत घेतली आहे.

अशा पिळदार बॉडीसाठी बॉबीने तब्बल ४ महीने मेहनत घेतल्याचं त्याच्या फिटनेस ट्रेनरने सांगितलं आहे. बॉबीचा या वयातील फिटनेस आणि ‘अ‍ॅनिमल’मधील त्याची भूमिका याची सोशल मिडीयावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. त्यामुळेलवकरच या चित्रपटातील बॉबीच्या पात्राचा एक स्पिन-ऑफ चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know who is this bollywood actor who just did comeback in ranbir kapoors animal avn