रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. अशातच आता प्रसिद्ध गायक अदनान सामी यानेदेखील या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी भाष्य करताना अदनान सामीने ‘शोले’, अमर अकबर अॅंथनी’, ‘दीवार’ या जुन्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
marathi movie Phulvanti will be released on October 11
‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?

आणखी वाचा : अ‍ॅनिमल: सामाजिक नीतिमत्तेचा मुखवटा फाडणारी, चित्रपटसृष्टीला हादरवून सोडणारी अत्यंत आवश्यक अशी कलाकृती

आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर याबद्दल शेअर करत अदनानने लिहिलं, “कृपया लोकांनी चित्रपटांवर जास्त विचार करणं आणि त्याची चिरफाड करणं थांबवायला हवं. तो एक चित्रपट आहे, काल्पनिक कथा आहे, मनोरंजन आहे. त्यातही जर तुम्ही लॉजिक शोधत असाल, तर मग ‘अमर अकबर अॅंथनी’मधील रक्तदान करतानाच्या सीनमागील लॉजिक शोधून दाखवा. एका आईला तीन मुलं एकत्र रक्त देताना दाखवलं होतं, त्यावेळी त्या चित्रपटाने इतिहास रचला होता. ‘दीवार’ चित्रपटातील नैतिकता नेमकी कोणती अन् ‘शोले’च्या क्लायमॅक्सला ठाकूर आणि गब्बरमधील मारामारीमागील लॉजिक सांगू शकाल का? आपण ‘गॉडफादर’ पहात मोठे झालो, टेरेंटिनोने संपूर्ण फिल्मी करिअरच हिंसाचारावर उभं केलं, आपल्याला अल पचीनोचा स्कारफेस आवडला.”

अद्याप अदनानने ‘अ‍ॅनिमल’ पाहिलेला नसून त्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये तो पुढे म्हणाला, “जर चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं असेल तर याचा अर्थ साफ आहे की फक्त प्रौढ लोकच हा चित्रपट पाहू शकतात. कारण प्रौढ लोकांना काय योग्य आणि अयोग्य यात फरक करता येतो. त्यामुळे जास्त विचार करू नका, चित्रपटाचा आनंद घ्या आणि निवांत घरी जा. मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही, पण कलेच्या खातर मी एखाद्या कलाकृतीच्या मागे खंबीरपणे उभा राहू शकतो. आपण प्रेक्षक आहोत आणि आपल्याला एखादी कलाकृती डोक्यावर घेण्याचा आणि एखादी कलाकृती नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपण तरीही ‘जगा आणि जगू द्या’ या नियमानुसार वागायला हवं. तुम्हाला कुणीही काहीही बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी बळजबरी करत नाहीये, त्यामुळे तुम्हीदेखील तुमची मतं इतरांवर लादू नका. शेवटी तो एक चित्रपट आहे, कल्पना आहे.”

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा आहे. रणबीरसह या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, शक्ति कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.