Hera Pheri Is A Remake Of Malyali Film : प्रियदर्शन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत त्यांनी आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते ‘हेरा फेरी ३’च्या कामात व्यग्र आहेत. अशातच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक करताना काय आव्हानं असतात याबद्दल सांगितलं आहे.
‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ हे बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. या चित्रपटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. प्रियदर्शन यांनी या चित्रपाटांचं दिग्दर्शन केलेलं. परंतु, तुम्हाला माहित आहे का हा चित्रपट एका मल्याळम चित्रपाटाचा रिमेक आहे. याबद्दल त्यांनी स्वत: सांगितलं आहे. ‘पिंकव्हिला’शी संवाद साधताना त्यांनी याबद्दल सांगितलं की, हा चित्रपट बनवताना किंवा आतासुद्धा त्यांनी तो मूळ मल्याळी सिनेमा यातील कलाकारांना दाखवलेला नाही.
चित्रपटांचे रिमेक बनवण्याबद्दल प्रियदर्शन यांची प्रतिक्रिया
रिमेक, सिक्वल यांबद्दल ते म्हणाले, “मी रिमेक बनवताना मूळ सिनेमा कधीच कलाकरांना दाखवला नाही. मी पूर्वी ही चूक केलेली पण तेव्हा मी एका मल्याळी सिनेमाचा रिमेक करत होतो आणि मी मोहनलाल यांचा चित्रपट कलाकारांना दाखवला आणि त्यांनी मोहनलाल यांच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला.” प्रियदर्शन पुढे म्हणाले, त्यांच्या मते प्रत्येक कलाकाराची एक वेगळी पद्धत असते त्यामुळे कलाकारंनी रिमेक पाहून कोणाचीतरी बरोबरी करण्यापेक्षा ते स्क्रीप्टमध्ये काही बदल करतात.
प्रियदर्शन यांनी पुढे दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक का चालत नाही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “९० टक्के दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक फ्लॉप होतात, कारण ते बहुतांश वेळा दाक्षिणात्य चित्रपटांसारखेच असतात.” ते हिंदी चित्रपटांसारखे वाटत नाही. पुढे त्यांनी मणिचित्रथझु (Manichitrathazhu) या मल्याळी चित्रपटाचा भूल भुलैया हा हिंदी रिमेक मात्र वेगळा ठरला .हा सिनेमा फक्त भाषांतर वाटत नाही तर हिंदी संस्कृतीशी जोडलेला वाटतो.
‘हेरा फेरी’ ‘या’ मल्याळी चित्रपटाचा रिमेक आहे
प्रयदर्शन यांनी पुढे ते खूप क्वचित चित्रपटांचे रिमेक बनवतात असं सांगितलं. ते म्हणाले “मी आजवर कुठलाही चित्रपट जसाच्या तसा बनवला नाही पण हेरा फेरी हा माझा पहिला असा चित्रपट आहे जो जसा होता तसाच कॉपी केला त्याचं संवादही लिहिले गेले नाही तर फक्त त्यांचं हिंदी ट्रान्सलेशन करण्यात आलं.” ‘हेरा फेरी’ हा चित्रपट १९८९मध्ये आलेल्या ‘रामजी राव’ या मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे.