बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित ही जोडी खूपच सुपरहिट राहिली. सलमान आणि माधुरीने १९९१ मध्ये पहिल्यांदा ‘साजन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. त्यानंतर आलेल्या ‘हम आपके हैं कौन’ने तर बॉक्स ऑफिसवर तगडा गल्ला जमवला होता. मोठ्या पडद्यावरील दोघांची जोडी तुफान गाजली. त्याआधी दोघांनी १९९३ मध्ये ‘दिल तेरा आशिक’मध्येही दिसले होते पण त्यांचा ‘हम आपके है कौन’ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान आणि माधुरीचे एकामागोमाग एक चित्रपट आले आणि हिट झाले. त्यानंतर माधुरी दीक्षितला सलमानबरोबर ‘हम साथ साथ है’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. पण या चित्रपटासाठी माधुरीने चक्क नकार दिला. त्यानंतर या चित्रपटात अभिनेत्री तब्बूला घेण्यात आलं. एका मुलाखतीत माधुरीने ‘हम साथ साथ हैं’मधील भूमिका नकारण्यामागचं कारण सांगितलं होतं.

आणखी वाचा- अभिनेत्री कुब्रा सैतने सांगितला सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली “पाच तास उशिरा येऊनही…”

‘हम साथ साथ हैं’ चित्रपटात माधुरी दीक्षितला सलमान खानच्या वहिनीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. या भूमिकेबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, “दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना ‘हम साथ साथ है’मध्ये मला कास्ट करायचं होतं. पण कोणत्या भूमिकेसाठी याबाबत बराच गोंधळ होता. मी करिश्मा कपूर किंवा सोनाली बेंद्रे यांनी साकारलेल्या भूमिका साकारू शकत नव्हते. कारण त्याआधी सलमान आणि माझा ‘हम आपके हैं कौन’ सुपरहिट ठरला होता.”

“त्यामुळे त्यानंतरच्या चित्रपटात सूरजजींच्या चित्रपटात माझी भूमिका त्याहून चांगली असणं अपेक्षित होतं. मला एक पाऊल मागे येऊन कोणतीही भूमिका साकारायची नव्हती. बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला तब्बूने साकारलेली भूमिका ऑफर केली. ज्यात एक सीन होता की सलमान खान त्याच्या वहिनीच्या पायांना हात लावून नमस्कार करतो आणि तिला मिठी मारतो. याच सीनमुळे मी ही भूमिका नाकारली. ‘हम आपके हैं कौन’मध्ये आमच्या रोमान्सचं कौतुक झाल्यानंतर सलमानने माझ्या पायांना स्पर्श करून मला नमस्कार करणं मला ठीक वाटलं नाही.” असं माधुरी या मुलाखतीत म्हणाली होती.

आणखी वाचा-Video : सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या ‘घोडे पे सवार’ गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदा, नेटकरी म्हणाले, “अनुष्कापेक्षा…”

दरम्यान माधुरी दीक्षित आणि सलमान खान ही बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी ठरली. दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर खूपच गाजली होती. दोघांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा ‘साजन’ चित्रपटात एकत्र काम केलं. त्यानंतर १९९३ मध्ये ‘दिल तेरा आशिक’ आणि १९९४ मध्ये ‘हम आपके हैं कौन’मध्ये काम केलं. त्यांचे हे चित्रपट हिट ठरले. तर २००२ मध्ये या दोघांनी ‘हम तुम्हारे हैं सनम’मध्ये एकत्र काम केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is the reason why madhuri dixit reject film hum sath sath hai with salman khan mrj