Housefull 5 Advance Booking : तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ आज ( ६ जून ) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. या मल्टीस्टारर सिनेमात प्रेक्षकांना जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. याशिवाय या सिनेमाचे दोन क्लायमॅक्स प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडणार आहे. बुकिंगदरम्यान, ‘हाऊसफुल ५ ए’ व ‘हाऊसफुल ५ बी’ असे दोन क्लायमॅक्स असलेले पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय सिनेमात एकूण २० लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

‘हाऊसफुल ५’ सिनेमाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच मोठी कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘हाऊसफुल ५ ए’च्या जवळपास १ लाख ७६ हजार २७१ तिकिटांची विक्री प्रदर्शनाआधी झाली होती. त्यामुळे ‘हाऊसफुल ५ ए’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ५.६७ कोटी कमावले आहेत.

तर, ‘हाऊसफुल ५ बी’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ७६ हजार ५४३ तिकिटांच्या विक्रीतून २.३५ कोटी कमावले आहेत. त्यामुळे या दोन्ही भागांची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये एकत्रित कमाई ८.०२ कोटी एवढी झाली आहे.

आता अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगला गल्ला जमावल्यावर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कोटींची ओपनिंग करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपट प्रदर्शित होताच यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करत चित्रपटाची संपूर्ण टीम व नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

“रितेशला या सिनेमासाठी हाऊसफुल शुभेच्छा” असं कॅप्शन लिहित जिनिलीयाने खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीसह त्यांच्या दोन्ही मुलांनी रितेशला मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

जिनिलीया देशमुखची पती रितेशसाठी खास पोस्ट

दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, डिनो शर्मा, डीनो शर्मा, डीनो शर्मा, रणजी शर्मा, नाना पाटेकर, आणि आकाशदीप साबीर असे एकूण २० दमदार कलाकार एकत्र झळकले आहेत.