Hum Saath Saath Hain Fame Actress Suffered Mental distress : लग्नानंतर काही वेळा अभिनेत्रींना अभिनय क्षेत्रात काम करण्यापासून रोखलं जातं. त्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुटुंबीयांकडून तितकासा पाठिंबा मिळत नाही. असंच काहीसं झालेलं बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर.

‘हम साथ साथ हैं’, ‘कुछ कुछ होता हैं’ यांसारख्या चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे नीलम कोठारी. माध्यमांच्या वृत्तानुसार नीलमला लग्नानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी नवऱ्यानं विरोध केला होता. नीलमनं ब्रिटिश व्यावसायिक रिशी सेथियाबरोबर लग्न केलं होतं. परंतु, लग्नानंतर तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, तिला तिची ओळख लपवण्यासाठी सांगण्यात आलं होतं, ज्यामुळे तिला मानसिदृष्ट्या त्रास झाला होता.

नीलमनं या सगळ्याला वैतागून तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ती भारतात परतली. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात केली. नीलमनं त्यानंतर अभिनेता समीर सोनीबरोबर दुसरं लग्न केलं. तिला व समीरला एक मुलगा असून, ती समीरबरोबर आता सुखाचा संसार करीत आहे.

अभिनयासह नीलम आता एक नामांकित व्यावसायिकही आहे. तिचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. नीलम व समीर यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी २४ जानेवारी २०११ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी एका मुलीला दत्त्क घेतल, जिचं नाव त्यांनी अहाना, असं ठेवलं आहे.

नीलमच्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं १९८४ मध्ये आलेल्या ‘जवानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा एक म्युझिकल सिनेमा होता आणि ती त्यामध्ये करण शाहबरोबर झळकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही; परंतु नीलमनं या चित्रपटात केलेल्या कामानं अनेकांचं लक्ष वेधलं गेलं होतं.

नीलमनं त्यानंतर ‘एक था राजा’, ‘सौदा’, ‘अंतिम न्याय’, ‘परंपरा’, ‘एक लडका एक लडकी’, ‘खुले आम’, ‘अग्निपथ’, ‘घर का चिराग’, ‘जखम’, ‘शंकरा’, ‘प्यार का कर्ज’ यांसारख्या चित्रपटांत विविध भूमिका केल्या. त्यासह तिनं ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात साकारलेल्या संगीताच्या भूमिकेसाठी तिला आजही अनेक जण ओळखतात.