IIFA Awards 2025: सध्या जयपूरमध्ये पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्याची खूप चर्चा रंगली आहे. या पुरस्कारातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, करीना कपूर अशा बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स केला. याच पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहरने वजन घटवण्यामागचं गुपित सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून करण जोहर ट्रान्सफॉर्मेशनमुळे खूपच चर्चेत आहे. वजन घटल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. कोणी करण आजारी असल्याचं म्हणत आहे. तर कोणी करणने ओझेंपिक, ज्यामुळे वजन कमी होते. हे औषध करण घेतल्याचं सांगत आहेत. याच ट्रोलर्सची आता करण जोहरने बोलती बंद केली.

करण जोहर माध्यमाशी संवाद साधताना विचारलं की, तू वजन कसं घटवलं? तेव्हा करण म्हणाला, “माझं वजन कमी करण्यामागील गुपित म्हणजे निरोगी राहणं, योग्य खाणं, योग करणं, चांगलं दिसण्याचा सतत प्रयत्न करणं. यामुळेच माझ्यात इतका मोठा बदल झाला आहे.” त्यानंतर करणला दिनचर्येबाबत विचारलं असता हसत म्हणाला, “हे जर सांगितलं तर मी माझं सगळंच गुपित सांगेल.”

दरम्यान, गेल्यावर्षी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘फॅब्युलस लाइव्स वर्सेस बॉलीवूड वाइव्स’मध्ये महीप कौरने ओझेंपिक सारख्या औषधांचा उल्लेख केला होता. त्यानंतर करण जोहरनेदेखील याचा वापर करत असल्याचा अफवांना उधाण आलं. पण आता या अफवांना करणने पूर्णविराम दिला आहे. योग्य आहार आणि व्यायामामुळे वजन कमी केल्याचं करणने स्पष्ट सांगितलं.

‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये ‘या’ चित्रपटाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार

‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला. या चित्रपटाने एक, दोन नव्हे तर १० पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘लापता लेडीज’ ठरला. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराची मानकरी किरण राव ( Kiran Rao ) ठरली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने नितांशी गोयल हिला गौरविण्यात आलं. याव्यतिरिक्त ‘लापता लेडीज’ चित्रपटाने कोण-कोणते पुरस्कार जिंकले? जाणून घ्या…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – लापता लेडीज
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नितांशी गोयल (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – किरण राव (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – प्रतिभा रांटा (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रवि किशन (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – संपत राय (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट गीत – प्रशांत पांडे- सजनी रे (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग- जबीन मर्चेंट (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा- स्नेहा देसाई (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट मूळ कथा -बिप्लब गोस्वामी (लापता लेडीज)
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iifa awards 2025 filmmaker karan johar has finally laid the speculation to rest attributing his weight loss pps