बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हळू हळू अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. जान्हवी कपूरला अभिनयाच्या कौटुंबीक पार्श्वभूमी असल्याने तिला चित्रपट मिळत आहेत असं बोललं जातं पण आता हा टॅग पुसून टाकण्यासाठी जान्हवी प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या करिअरबरोबरच जान्हवी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अनेकदा तिच्या डेटिंगच्या अफवाही उडताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत जान्हवीने यावर भाष्य केलं. अशा अफवा काही वेळा त्रासदायक असतात असंही यावेळी जान्हवी म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवी कपूरने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. जेव्हा जान्हवीला, ‘आतापर्यंत तू ऐकलेल्या स्वतःबद्दलच्या अफवांमधील सर्वात वाईट अफवा कोणती?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जान्हवी म्हणाली, “मी आणि माझी बहीण खुशी कपूर एकाच व्यक्तीला डेट करत आहेत असं बोललं गेलं होतं पण यामुळे मला खूप त्रास झाला होता.”

आणखी वाचा- सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाला नाही, तर ‘या’ उद्योगपतीला डेट करतेय जान्हवी कपूर?

जान्हवीच्या मते या अफवामध्ये सर्वात वाईट गोष्ट अशी असते की यात त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही ओढलं जातं. जान्हवी म्हणाली, “आमच्या दोघींबद्दल अशी अफवा पसरली होती की, मी अक्षत राजनला डेट करत होते त्यांनंतर आमचं ब्रेकअप झालं आणि मग खुशी त्याला डेट करू लागली. पण सत्य हेच होतं की ना मी कधी अक्षतला डेट केलं होतं ना कधी खुशीने त्याला डेट केलं. तो फक्त आमचा बालपणीचा चांगला मित्र आहे.”

आणखी वाचा- “तुझ्या स्वयंवरमध्ये विजय देवराकोंडाला बघायला आवडेल का?”, जान्हवी म्हणते “त्याचं लग्न…”

दरम्यान काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर पैसे देऊन जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देतात असं बोललं गेलं होतं. जान्हवीने इशान खट्टरसह ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट केले. लवकरच ती थ्रीलर चित्रपट ‘मिली’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सनी कौशल आणि मनोज पहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असून येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is janhvi and khushi kapoor was dating same guy actress answer on it mrj