सध्या देशभरात दिवाळीची मोठी धामधूम आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूडमधील सेलिब्रिटींपर्यंत सर्वांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणाच्या निमित्ताने सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांनी त्याच्या घरी पार्ट्यांचे आयोजन केले होते. या आलिशान पार्ट्यांमधले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री करिना कपूर-खानने दिवाळीचा सण साजरा करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीना कपूर-खान सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती या माध्यमाद्वारे तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. दिवाळी सणानिमित्त तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये करीना, सैफ आणि त्यांची दोन मुलं तैमूर-जेह (जहांगिर) दिवाळी साजरी करत असल्याचे पाहायला मिळते. या फोटोंना तिने “हे आमचं कुटुंब. आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा”, असे कॅप्शन दिले आहे. त्यावेळी सैफ, तैमूर आणि जेहने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता, तर करीना लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये होती. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करुन चाहत्यांनी त्यांची पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – आलिया भट्टनेही केली दिवाळी साजरी; सासरी जाऊन केलं थाटात लक्ष्मीपूजन

या पोस्टमधल्या पहिल्या दोन फोटोंमध्ये सैफ आणि करीना कॅमेऱ्यासमोर पोझ देऊन उभे आहेत. त्यांच्या मागे दारावर फुलांची माळ आणि त्याखाली रांगोळी काढलेली आहे. तिसरा फोटो तैमूर-जेहचा आहे. ते दोघे खिडकीला लावलेली रोषणाई पाहत आहेत. चौथ्या फोटोमध्ये जेह जमिनीवर लोळत रडताना असून तैमूर त्यांच्याकडे पाहताना दिसतो. त्याच्याकडे लक्ष न देता सैफ-करीना तैमूरसह फोटो काढण्यामध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. फोटो काढण्यासाठी इच्छुक नसल्याने तो रडायला लागला असावा.

आणखी वाचा – दिवाळी पार्टीमध्ये अचानक रोमँटिक झाला कपिल शर्मा, सर्वांसमोर पत्नीला केलं Kiss अन्…

ऑगस्ट २०२२ मध्ये करीनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तिने आमिर खानसह काम केले होते. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. यामध्ये तिने रुपा हे पात्र साकारले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटामध्ये ती झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeh was seen having a tantrum during diwali celebrations watch kareena kapoor instagram photos yps