kajol Talks About Daughter Nysa Devgan Bollywood Debut : काजोल व अजय देवगण बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्यांची मुलगीदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

काजोल व अजय देवगणची मुलगी निसा देवगण सोशल मीडियावर फार सक्रिय नसते; पण अनेकदा ती आई-वडिलांबरोबर स्पॉट होत असते. त्यावेळचे तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे अनेकदा इतर स्टारकिडप्रमाणे तीसुद्धा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का, असा प्रश्न काजोल व अजय यांना विचारला जातो.

करण जोहर निसा देवगणला बॉलीवूडमध्ये करणार लॉंच?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ते दोघे लेकीबद्दल म्हणालेले, “तिला अभिनयात रस नाही आहे. पण, करणला तिला बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी मदत करायची आहे.” अशातच आता काजोलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. शुभंकर मिश्रासह संवाद साधताना तिला तिच्या मुलांना इंडस्ट्रीतून काही ऑफर आल्या आहेत का, इंडस्ट्रीतील कोणी त्यांना चित्रपटांसाठी विचारलं आहे का?, असा प्रश्न विचारला होता.

काजोल – अजय देवगणच्या लेकीला येत आहेत चित्रपटांच्या ऑफर

काजोल यावर म्हणाली, “मला या संदर्भात काही फोन आले आहेत.” पुढे ती म्हणाली, की तिच्या मुलीचं या क्षेत्रात करिअर करण्याबद्दल काही नियोजन नाहीये. त्यासह तिनं लेकीबद्दल असंही सांगितलं की, “तिला जे काही करायचं असेल ती त्याबद्दल आम्हाला सांगेल आणि तिला जे काही कराण्याची इच्छा असेल त्यासाठी आमचा तिला १०० टक्के पाठिंबा असेल.”

अजय देवगणनंदेखील ‘कॉफी विथ करण’च्या सीझन ८ मध्ये याबद्दल सांगितलेलं तो म्हणालेला, “सध्या तिला अभिनय क्षेत्रात यायचं नाहीये, तिला अभिनेत्री व्हायचं नाहीये.” काही दिवसांपूर्वी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने निसाचे काही फोटो पोस्ट केले होते, ज्याच्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यावेळी त्यानं निसाचे सुंदर लेहंग्यातील फोटो पोस्ट केलेल आणि त्याला निसा सिनेमा तुझी वाट बघतोय, अशी कॅप्शन दिली होती. त्यानंतर निसा देवगण बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का याबद्दल चर्चा झाली.