Tiger 3 Movie : सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट आज दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘टायगर ३’ पाहण्यासाठी आज सकाळपासूनच भाईजानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. काही भागांत पहाटेचे पहिले शो सुद्धा हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालं. आता ‘टायगर ३’ चित्रपटाबद्दल सिनेविश्वातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरला नेटकऱ्याने केले आक्षेपार्ह मेसेज; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “अनेक पुरुष…”

सोशल मीडियावर एकीकडे ‘टायगर ३’ चित्रपटाचं भरभरून कौतुक सुरू असतानाच दुसरीकडे, एका बॉलीवूड अभिनेत्याने केलेल्या एक्सने (ट्वीट) सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलीवूड समीक्षक व अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कमाल राशिद खान अर्थात केआरके सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. एक्स (ट्विटर)वर आपले मत व्यक्त करून केआरके सर्वांचे लक्ष वेधून घेतो. नुकतंच त्याने भाईजानच्या ‘टायगर ३’ बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

केआरके लिहितो, “प्रिय आदी चोप्रा, जर तुला पाकिस्तानच्या राजकारणावर आणि सद्य परिस्थितीवर चित्रपट बनवायचा होता, तर तू ‘टायगर ३’ हा हिंदी चित्रपट का बनवलास? यापेक्षी तू पाकिस्तानी चित्रपट बनवू शकला असतास. तू माझा वेळ, पैसा आणि शक्ती सगळं वाया घालवलं आहेत. त्यामुळे मी निश्चितपणे ग्राहक न्यायालयात खटला दाखल करणार आहे.”

हेही वाचा : Video: ‘टायगर ३’ चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ लीक; सलमान खानला वाचवण्यासाठी बादशाहची खतरनाक एन्ट्री

केआरकेने केलेल्या एक्स पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तू काहीपण बोल…हा चित्रपट ३०० कोटी नक्कीच कमावणार!” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने, “आमचे पैसे वाचवण्यासाठी धन्यवाद” अशी प्रतिक्रिया केआरकेच्या या एक्स (ट्वीट)वर दिली आहे. तसेच सलमानच्या काही चाहत्यांनी भाईजानची बाजू घेत केआरकेवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan aka krk tweets on salman khan tiger 3 movie he want to file case in consumer court sva 00