कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. रजनीकांत व ज्योतिका यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘फुकरे ३’ बरोबर प्रदर्शित झाला. सुरुवातीला चांगली कमाई करणाऱ्या कंगनाच्या या चित्रपटाला अद्याप ५० कोटींचा टप्पाही गाठता आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांना १० लाखांचा दंड ठोठावण्यात यावा, व्यापारी संघटनेची मागणी, जाहिरातीवरून झालाय वाद

‘चंद्रमुखी २’ने पहिल्या दिवशी ८.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ४.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.५ कोटी, चौथ्या दिवशी ६.८ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ४.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मंगळवारी म्हणजेच सहाव्या दिवशी ‘चंद्रमुखी २’ ने २.५ कोटींचा व्यवसाय केला. आता प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी चित्रपटाने किती कमाई केली, याबाबतचे आकडे समोर आले आहेत.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं बॉलीवूड पदार्पण, जान्हवी अन् साराशी कनेक्शन असलेला वीर आहे तरी कोण?

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘चंद्रमुखी २’ ने रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी १.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर कंगना रणौतच्या चित्रपटाची सात दिवसांची एकूण कमाई आता ३२.९५ कोटी रुपये झाली आहे. सात दिवसात चित्रपटाने केलेली कमाई पाहता इतक्यात तो ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, ‘चंद्रमुखी २’ दिग्दर्शन पी वासु यांनी केले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. हा चित्रपट डब करून हिंदीत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना रणौत व्यतिरिक्त राघव लॉरेन्स, लक्ष्मी मेनन, वदिवेलू, राधिका सरथकुमार, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, राव रमेश, सुभिक्षा कृष्णन आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut chandramukhi 2 box office collection day 7 hrc