बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. किंग खानच्या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. ‘जवान’ने फक्त १० दिवसांमध्ये तब्बल ४४०.४८ कोटींची कमाई केली आहे. शाहरुखला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहरने त्याचं कौतुक केलं आहे. अलीकडेच ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत करणने त्याच्या आणि शाहरुखच्या मैत्रीबद्दल सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “संस्कृतीने नटलेला भारत माझा…”, संकर्षण कऱ्हाडेने सातासमुद्रापार अमेरिकेत सादर केली देशभक्तीपर कविता, सर्वत्र होतंय कौतुक

करण जोहर म्हणाला, “‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या प्रीमियरला धमक्यांमुळे मी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. शाहरुखने मला त्या परिस्थितीतून बाहेर काढलं ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी तुझ्यासाठी मी बंदुकीच्या गोळ्या सुद्धा अंगावर घेईन असं शाहरुख म्हणाला होता. त्या क्षणाला आता हे नातं आयुष्यभर असंच राहणार याची जाणीव मला झाली होती.”

हेही वाचा : “आकर्षक सजावट, मोदक अन्…”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर गणेशोत्सवाची तयारी, जुई गडकरीने शेअर केली खास झलक

करण जोहरने या घटनेबद्दल विस्तृतपणे त्याच्या ‘द अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रात लिहिलं आहे. करण लिहितो, “एक दिवशी माझा फोन वाजला आणि तो फोन माझ्या आईने उचलला. मला अंडरवर्ल्डकडून फोन आला होता. समोरून एक माणूस धमकी देत होता. त्याने माझ्या आईलं सांगितलं की, तुमच्या मुलाने लाल टी-शर्ट घातला आहे, मी त्याला आता सहज पाहू शकतो. त्यामुळे जर तुम्ही तुमचा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित केला तर आम्ही त्याला शूट करू. काही कारणास्तव त्या लोकांना आमचा चित्रपट त्या शुक्रवारी प्रदर्शित होऊ द्यायचा नव्हता. याचं कारण मला माहिती नाही. तो फोन अबू सालेमचा होता. फोन ठेवल्यावर माझी आई थरथरत होती. तिने फोन ठेवला आणि थेट माझ्या रुमच्या दाराकडे धावत आली.”

“शाहरुखला जेव्हा या घटनेबद्दल समजलं तेव्हा तो म्हणाला, काय मूर्खपणा आहे? आत येऊन त्याने मला बाहेर काढलं. मी तुझ्या समोर इथे उभा आहे बघू तुला कोण गोळ्या घालणार? मी कुठेही जाणार नाही. असा विश्वास त्याने माझ्या आईला दिला. मी एक पठाण आहे. तुमच्या मुलाला मी काहीच होऊ देणार नाही. तो माझा भाऊ आहे घाबरू नका…त्याला काहीच होणार नाही.” असं करणने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने नेपाळी बॉयफ्रेंडसह गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्रीचा होणार नवरा?

दरम्यान, शाहरुख आणि करणने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. किंग खानचा नुकताच रिलीज झालेला ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिस चांगली कामगिरी करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar recalls how shahrukh khan responded when underworld threatened his life sva 00